औरंगाबाद : स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट काॅर्पोरेशनची (एएससीडीएल) सात महिन्यांनंतर १६ जुलैला मेंटॉर बलदेवसिंह यांच्या अध्यक्षतेखाली सात महिन्यांनंतर बैठक होत आहे.
सफारी पार्कसाठीची दोनशे कोटी रुपयांची तरतूद, ई-गव्हर्नन्सचा, जीआयएस प्रकल्प, सायकल ट्रॅक, लाईट हाऊस, स्ट्रीट फॉर पिपल, ऑपरेशन कंट्रोल रूम, स्मार्ट सिटीची इमारत प्रस्तावांवर बैठकीत चर्चा होईल. स्मार्ट सिटीची पूर्ण योजना, तरतूद, मनपा आणि राज्य व केंद्र शासन वाटा याची माहिती बैठकीत दिली जाईल. या योजनेवर एएससीडीएल मेंटॉर म्हणून राज्याचे तत्कालीन मुख्य सचिव संजयकुमार यांच्या उपस्थितीत नोव्हेंबर २०२० मध्ये शेवटची बैठक झाली. त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर राज्य शासनाने उद्योग विभागाचे प्रधान सचिव बलदेवसिंह यांची एएससीडीएल मेंटॉरपदी नियुक्ती केल्यानंतर शुक्रवारी पहिली बैठक होत आहे. मनपा प्रशासक तथा एएससीडीएलचे मुख्याधिकारी आस्तिककुमार पांडेय यांच्यासह अधिकारी बैठकीला उपस्थित असतील.