नानेगाव येथील आबासाहेब विठ्ठल मगर (३५) हे आई कासाबाई मगर व बहीण अर्चना गजानन दुबल (३०) यांना उपचारासाठी पैठण येथे दवाखान्यात दुचाकीवर घेऊन गेले होते. उपचारानंतर सायंकाळी ते परत नानेगाव येथे जात असताना पैठण-पाचोड रस्त्यावर आखतवाडा परिसरातील डाव्या कालव्याच्या पुलाजवळ पाठीमागून वेगाने आलेल्या छोट्या टेम्पोनेे त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात कासाबाई मगर यांचा जागेवर मृत्यू झाला. तर आबासाहेब मगर व अर्चना दुबल हे दोघे बहीण-भाऊ जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोनि. किशोर पवार, फौजदार रामकृष्ण सागडे, जमादार सुधीर वाव्हळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना पैठण येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दुचाकीला धडक देऊन न थांबता सुसाट निघालेल्या छोट्या टेम्पोच्या चालकाला पोलिसांनी रहाटगाव येथून ताब्यात घेतले. याप्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा नाेंदविण्याचे काम सुरू होते.
फोटो : अपघातानंतर रस्त्याच्या बाजूला पडलेली दुचाकी.
070621\img_20210607_201514.jpg
अपघाता नंतर रस्त्याच्या बाजूला पडलेली मोटारसायकल.