शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्यांत ४६ लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 23:48 IST

जानेवारी ते जून २०१७ अखेर पोलीस दलातर्फे जिल्हाभरात मोहिम राबवून जुगारप्रकरणी १११ तर अवैध दारूविक्रीचे एकूण ६५५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही मिळुन आरोपींकडून कारवाई दरम्यान ४६ लाख ९० हजार १८४ रूपये मुद्देमाल जप्त करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा पोलीस दलातर्फे अवैध दारूविक्री तसेच जुगार खेळणाºयांविरूद्ध दरदिवशी मोहीम राबविली जाते. जानेवारी ते जून २०१७ अखेर पोलीस दलातर्फे जिल्हाभरात मोहिम राबवून जुगारप्रकरणी १११ तर अवैध दारूविक्रीचे एकूण ६५५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही मिळुन आरोपींकडून कारवाई दरम्यान ४६ लाख ९० हजार १८४ रूपये मुद्देमाल जप्त करण्यात आला.जिल्ह्यात अवैध दारूव्रिक्री तसेच जुगार खेळणाºयांवर पोलीस प्रशासनाकडून दरदिवशी मोहिम राबवून कारवाई केली जाते. जिल्हाभरात अवैध धंदेविरूद्ध कारवाई केली जात असली तरी, ग्रामीण भागात छुप्या पद्धतीने जुगार, मटका तसेच अवैध दारू विक्री होत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील अवैध-धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून प्रत्येक दिवशी मोहिम राबवून अवैध धंदेचालकांविरूद्ध कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील एकूण १४ पोलीस ठाणे हद्दीत पोलिसांनी विशेष मोहिम राबवून जुगारप्रकरणी १११ जणांविरूद्ध गुन्हे दाखल केले. त्यांच्याकडून १२ लाख १२ हजार २२२ रूपये मुद्देमाल व जुगारसाहित्य जप्त करण्यात आले. तर अवैध दारूविक्री प्रकरणी मोहिम राबवून ६५५ आरोपींविरूद्ध गुन्हे दाखल केले. त्यांच्याकडून ३४ लाख ७७ हजार ९६२ रूपये मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती स्थागुशाचे पोनि मारोती थोरात यांनी दिली. स्थागुशा, वाहतूक शाखा तसेच जिल्हा पोलीस प्रशासनाकडून अवैध दारूविक्री करणारे, तसेच दुचाकीवरून वाहतूक करणारे, गावठी दारूचे सडके रसायन पोलीसांनी जप्त केले. जुगार व दारूबंदी कायद्या अंतर्गत आरोपींविरूद्ध विविध पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयातर्फे दिली. परिसरात जुगारखेळ किंवा अवैध दारूविक्री होत असेल तर पोलिसांना तत्काळ माहिती देण्याचे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले.