शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनची चेन ब्रेक करण्यासारखी परिस्थिती; पण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:05 IST

औरंगाबाद : शहर आणि ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. शहराचा पॉझिटिव्हिटी रेट अवघ्या दोन टक्‍क्‍यांवर आला आहे. ...

औरंगाबाद : शहर आणि ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. शहराचा पॉझिटिव्हिटी रेट अवघ्या दोन टक्‍क्‍यांवर आला आहे. लॉकडाऊनची चेन ब्रेक करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, मृत्युसत्र अजूनही पूर्वीसारखेच सुरू आहे. अनलॉकनंतर पुन्हा परिस्थिती बिघडण्याची भीती शासकीय यंत्रणेला वाटत आहे. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित विविध दुकाने हळूहळू उघडण्यावर शासनाचा भर राहणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी नमूद केले.

केंद्र शासनाने अडीच महिन्यांपूर्वी महाराष्ट्रातील काही जिल्हे रेड झोनमध्ये असल्याचे घोषित केले होते. त्यात औरंगाबादचाही समावेश होता. मागील अडीच महिन्यांमध्ये आरोग्य यंत्रणा, पोलीस, महसूल आदी शासकीय यंत्रणांनी नागरिकांच्या सहकार्याने कोरोनाचा संसर्ग कमी करण्यात मोलाची भूमिका बजावली. शनिवारी शहरात ७१, तर ग्रामीण भागात १५७ बाधित रुग्ण आढळून आले. शनिवारी फक्त कोरानामुळे मरण पावलेल्या नागरिकांची संख्या २३ होती. कोरोना संशयित मृतांची संख्या वेगळीच आहे. संसर्ग कमी होत असला तरी मृत्युसत्र अजिबात थांबायला तयार नाही. त्यामुळे शासकीय यंत्रणेला अजूनही भीती वाटत आहे. शासनाने १ जूनपासून सर्व व्यापाऱ्यांनी दुकाने उघडण्याची मुभा दिली तर उद्रेक होईल, असेही वाटत आहे. शासनाने अनलॉकसंदर्भात वेगवेगळ्या विभागातील अधिकाऱ्यांकडून अभिप्राय मागविले आहेत. बाजारपेठ एकाच वेळी सुरू केल्यास गर्दी होईल, संसर्ग वाढेल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. राज्य शासन एकाच वेळी संपूर्ण बाजारपेठ उघडण्यास परवानगी देणार नाही, असेही सूत्रांनी नमूद केले.

व्यापारी दुकाने उघडण्यास उत्सुक

शहरात अगोदर अंशतः लाॅकडाऊन लावण्यात आले. नंतर राज्य शासनाकडून कडक निर्बंध घालण्यात आले. मागील दोन ते अडीच महिन्यांपासून व्यापाऱ्यांची दुकाने बंद आहेत. पावसाळ्यात दुकानांची डागडुजी आणि आर्थिक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असल्यामुळे शहरातील व्यापारी दुकाने उघडण्यास उत्सुक आहेत.

सक्रिय रुग्णसंख्याही घटली

घाटी रुग्णालय - ७०

सिव्हिल हॉस्पिटल - २५

खाजगी रुग्णालये - १६४

मेल्ट्रॉन हॉस्पिटल -१५४

कोविड केअर सेंटर-२०५

होम आयसोलेशन-३५०

संसर्ग कमी तरी दररोज चार हजार तपासण्या

मे महिना - एकूण तपासण्या

२९ - ३,६३९

२८ - ४,३८८

२७ - ४,३९७

२६ - ३,८७२

२५ - ४,११४