शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

नदी पात्राजवळ खेळत असणा-या भावंडांचा डोहात बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 14:59 IST

नदी पात्राजवळ खेळत असताना पाय घसरून डोहात पडलेल्या सख्या भावंडाचा नगीना पींपळगाव येथे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. रविवारी दुपारपासूनच सिद्धेश(८ )  व सुरेश ( ५) हि भावंडे बेपत्ता होती. आज सकाळी मुलांच्या  घराजवळील नदीपात्रात त्यांचे मृतदेह तरंगताना आढळून आली. 

वैजापुर ( औरंगाबाद ) : नदी पात्राजवळ खेळत असताना पाय घसरून डोहात पडलेल्या सख्या भावंडाचा नगीना पींपळगाव येथे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. रविवारी दुपारपासूनच सिद्धेश(८ )  व सुरेश ( ५) हि भावंडे बेपत्ता होती. आज सकाळी मुलांच्या  घराजवळील नदीपात्रात त्यांचे मृतदेह तरंगताना आढळून आली. 

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, राजस्थान येथील रगू भरवाड हे कुटुंबासह गेल्या दोन वर्षापासून गायी संगोपनासाठी येथे राहतात. रविवारी दुपारीपासून त्यांची दोन्ही मुले बेपत्ता होती. संपूर्ण गावाने त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु , त्यांचा शोध लागला नव्हता. यातच आज सकाळी त्यांची मृतदेह भरवाड यांच्या घराजवळील नदीपात्रात तरंगताना आढळून आली.  पोलिसांच्या अंदाजानुसार सिद्देश व सुरेश हि भावंडे घराच्या शेजारी असलेल्या नदीकाठी ओढ्याच्या कडेला खेळत असताना पाय घसरून डोहात पडली. डोहात खोलवर गाळ असल्याने दोघेही गाळात फसली. त्यात बुडत असताना त्यांना वेळेवर मदत न मिळाल्याने त्यांच्यावर मृत्यू ओढवला. 

सकाळी मृतदेह नदीपात्रात तरंगत असल्याची माहिती मिळताच गावक-यांनी घटनास्थळी जमून त्यांना पाण्यातून बाहेर काढले. याप्रकरणी वैजापुर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक फौजदार एस.के.धादवड करीत आहेत.या हृद्यविदारक घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.