उस्मानाबाद : सराफा व्यावसायिकांवर १ टक्के एक्साईज ड्युटी तसेच इतर जाचक नियम व अटींच्या निषेधार्थ सराफ, सुवर्णकार असोसिएशनने पुकारलेल्या तीन दिवसीय बंदला येथील असोसिएशननेही पाठिंबा दर्शविला आहे.बुधवारी असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यात म्हटले आहे की, केंद्र सरकारच्या अंदाजपत्रकात या व्यवसायावर एक टक्का इक्साईज ड्युटीसह इतर खरेदीवरही नवीन जाचक नियम व अटी लावण्यात आल्या आहेत. शिवाय आयकरही पाच टक्क्यांनी वाढविण्यात आला आला आहे. हा कर व त्यातील तरतुदी या सर्वसामान्य सराफ व सुवर्णकार उद्योजकांसाठी खूपच जाचक ठरणाऱ्या आहेत. याच्या निषेधार्थ भारतभर हा बंद पुकारण्यात आला असून, यास या असोसिएशनचाही पाठिंबा असल्याचे म्हटले आहे.निवेदन देतेवेळी जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष विष्णूदास सारडा, संजय गणेश, सतीश घुले यांच्यासह मयूर जालनेकर, दत्ता माळी, संजय साळी, राम वंजारी, कृष्णा डहाळे, सचिन पोतदार, प्रकाश खंडेलवाल, गोपाळ म्हेत्रे, गणेश टेहरे यांच्यासह शहर असोसिएशनचेही पदाधिकारी उपस्थित होते. याची दखल नाही घेतल्यास बेमुदत बंदचा इशाराही यावेळी देण्यात आला.
सराफ, सुवर्णकारांचा तीन दिवस बंद
By admin | Updated: March 3, 2016 00:06 IST