उस्मानाबाद : जिल्ह्यात यंदा दहावीच्या निकालाने उच्चांक गाठला आहे. त्यातही मुलींनी बाजी मारली आहे, जिल्ह्यातील विविध शाळांनी दहावी परीक्षेत मिळविलेले यश निश्चितच कौतुकास्पद आहे. जयप्रकाश विद्यालय रुईभर उस्मानाबाद - तालुक्यातील रुईभर येथील जयप्रकाश विद्यालयाचा ९२ टक्के निकाल लागला आहे. परीक्षेसाठी १५० विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून,राजश्री रामदास कोळगे हिने ९२.४० टक्के गुण मिळवून विद्यालयातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. ऐश्वर्या रायजादे ८९.२० टक्के, राजकन्या गोंडगिरे ८८.२० टक्के, सरिता माढेकर ८८ टक्के तर पूजा कोरे हिला ८७.८० टक्के गुण मिळाले आहेत. आर्य चाणक्य विद्यालय उस्मानाबादउस्मानाबाद- येथील आर्य चाणक्य विद्यालयाचा दहावीचा निकाल ९२.७७ टक्के लागला असून, श्रीराम मुकुंद पाटील याने ९५.६० टक्के गुण घेऊन विद्यालयातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. परीक्षेला ८३ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ७७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, २० जण विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. शंतनु पेन्शनवार याने ९५ टक्के, स्रेहा कचरे ९४.२०, प्रशांत गवळी ९३.८०, काजल ननवरे ९२, प्रार्थना चंदनशिवे ९०.८० हे विद्यार्थी विशेष गुणवत्ताधारक ठरले आहेत. उद्धवराव पाटील प्रशाला उस्मानाबादउस्मानाबाद- येथील भाई उद्धवराव पाटील प्रशालेचा निकाल ९८.८३ टक्के लागला आहे. विद्यालयातील आश्विनी शामराव वाघमारे हिने ९२ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. श्रद्धा घोरपडे ९०.६० टक्के, कल्पना मारवाडकर ९०.६० तर साक्षी घायाळ हिने ८७ टक्के गुण मिळविले आहेत. विद्यालयातील ३२ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले असून, १८ विद्यार्थ्यांनी ८० टक्केपेक्षा अधिक गुण मिळविले आहेत. हरिभाऊ घोगरे हायस्कूल उपळे उस्मानाबाद- तालुक्यातील उपळे मा. येथील रयत शिक्षण संस्थेच्या हरिभाऊ घोगरे हायस्कूलचा ८७.३४ टक्के निकाल लागला आहे. अक्षय काळे, आश्विनी मुंडे, गणेश राऊत हे विद्यार्थी गुणानुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय ठरले आहेत. विद्यानिकेतन आश्रमशाळा शिंगोलीउस्मानाबाद- तालुक्यातील शिंगोली येथील विद्यानिकेतन माध्यमिक आश्रमशाळेचा निकाल ८०.७६ टक्के लागला आहे. ७७ टक्के गुण घेऊन अमोल चव्हाण प्रथम, ७५ टक्के गुण घेऊन प्रज्ञा पुरी द्वितीय तर ७३ टक्के गुण मिळवून किशोर धोत्रे याने तृतीय क्रमांक पटकाविला आहे.लाटे हायस्कूल उस्मानाबादउस्मानाबाद- येथील भागिरथीबाई लाटे हायस्कूलचा दहावीचा निकाल ८० टक्के लागला असून, सोनाली झोंबाडे हिने ७१.२० टक्के गुण घेऊन प्रथम, अजित पवार याने ६९.६० टक्के गुण घेऊन द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. अल्लामा ऊर्दू हायस्कूलउस्मानाबाद- येथील अल्लामा सिद्दिक अहमद ऊर्दू हायस्कूलचा ९१.३० टक्के निकाल लागला आहे. पिरजादे मुसदिक याने ८२ टक्के गुण घेऊन प्रथम तर शेख शायेजा फातेमा हिने ७६ टक्के गुण घेऊन द्वितीय क्रमांक पटकाविला. केशव विद्यामंदिर खानापूरउस्मानाबाद- तालुक्यातील खानापूर येथील केशव माध्यमिक विद्यालयाचा ९२.३१ टक्के निकाल लागला आहे. कविता चांदणे हिने ८७.६० टक्के गुण मिळवून विद्यालयातून प्रथम क्रमांक मिळविला तर प्रियंका गरड हिने ८३.४० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकाविला. प्रियंका कात्रे हिने ८३.२० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला आहे. रामानंद विद्यालय काजळाउस्मानाबाद- तालुक्यातील काजळा येथील रामानंद विद्यालयाचा दहावीचा निकाल ९७.३७ टक्के निकाल लागला आहे. नितीन आकोसकर ८०.९२, रेश्मा दीक्षित ७६.७७, ऐश्वर्या पाठक ७६.३१ टक्के गुण मिळवून विद्यालयातून अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय आले आहेत. समता विद्यालय उस्मानाबादउस्मानाबाद- शहरातील समता माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९१.४६ टक्के लागला. विद्यालयातून स्रेहल तानाजी शिंदे हिने ९५.६० टक्के गुण घेऊन प्रथम, वृषाली सुनील दंडनाईक हिने ९४.६० टक्के गुण मिळवून द्वितीय, पल्लवी भगवंतराव हंगरगेकर हिने ९०.६० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला. तसेच सायली अतूल पाटील हिनेही ९०.४० गुण मिळवून यश संपादन केले आहे. रामचंद्र पाटील विद्यालय किणीउस्मानाबाद- तालुक्यातील किणी येथील श्रीसंत रामचंद्र पाटील विद्यालयाचा निकाल ९० टक्के लागला. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. आश्रमशाळा बावीउस्मानाबाद - तालुक्यातील (विद्यानगर) बावी येथील जवाहर माध्यमिक आश्रमशाळेचा निकाल ९२.१६ टक्के लागला आहे. परीक्षेत १०२ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यातील १५ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले तर ३६ विद्यार्थी प्रथमश्रेणीत आले आहेत. विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्यांमध्ये ज्ञानेश्वर समेटवार, अजित राठोड, धर्मराज थोरबोले, राणी पवार, अंजना उंडे, मुन्ना राठोड, ज्योती हौदाडे, अजय सोनकांबळे, वर्षाराणी घुगे, विशाल बोकेफोडे, अशोक वडजे, स्रेहल तांबे, दिपक वडजे, श्रीकांत सूळ यांचा समावेश आहे. मेसाई माध्यमिक विद्यालयउस्मानाबाद- तुळजापूर तालुक्यातील मेसाई माध्यमिक विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला. या शाळेतून स्वाती चौधरी ९३.८० टक्के गुण मिळवून प्रथम, सागर रणदिवे ८६.४० टक्के गुण मिळवून द्वितीय, शुभांगी पाटील व बळवंत कोकरे हे ८०.६० टक्के गुण घेऊन तृतीय आले आहेत. कै. शकुंतला देशमुख प्रशाला अनसुर्डाउस्मानाबाद- तालुक्यातील अनसुर्डा येथील कै. शकुंतला देशमुख प्रशालेचा निकाल ८३.३ टक्के लागला. या प्रशालेचा प्रकाश रघुनाथ चव्हाण याने ७५ टक्के गुण मिळवून यश संपादन केले. तसेच शाळेचे भीमराव महादेव धावारे, सागर सुनील कोल्हे यांनीही यश संपादन केले आहे. किसान विद्यालय पोहनेरउस्मानाबाद- तालुक्यातील पोहनेरच्या किसान विद्यालयाचा ९०.९१ टक्के निकाल लागला आहे. सूरज बबन सुतार व मेहराज युसुफ सय्यद यांनी ८६.६० टक्के असे समान गुण मिळविले आहेत. सिटी प्राईड स्कूलउस्मानाबाद- येथील सिटी प्राईड सेकन्डरी इंग्लिश स्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला. विद्यालयाच्या नुरी ताहा हिने ८१ टक्के गुण मिळवून विद्यार्थिनीत ती सर्वप्रथम आली आहे. न्यू हायस्कूल आनाळापरंडा- तालुक्यातील आनाळा येथील न्यू हायस्कूलचा निकाल ८३.८७ टक्के लागला. परीक्षेला बसलेल्या ६२ पैकी ५२ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले असून, स्रेहल सुधाकर पाटील हिने ९२ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला. शुभंम सतीश गादिया याने ९१.४० टक्के याने द्वितीय तर गणेश लहू अंकुश याने ९१.२० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला आहे. जि.प. कन्या प्रशाला उस्मानाबादउस्मानाबाद- येथील जि. प. कन्या प्रशालेचा निकाल ६७ टक्के लागला. प्रशालेच्या ऊर्दू माध्यमातून मोमीन सानिया तरन्नुम नाजीरोद्दीन प्रथम, शेख जेबा मुस्कान लियाकत द्वितीय, सय्यद शाहीस्ता अशफाक व सय्यद असनाबेगम अतिकउररहेमान या तृतीय आला. मराठी माध्यमातून या प्रशालेची संगीता किसन कावळे प्रथम, ज्योती सोमनाथ चौरे द्वितीय तर सय्यद अल्मास रशीद तृतीय आला आहे. तसेच उमरगा तालुक्यातील दाळींब येथील मौलाना आझाद ऊर्दू हायस्कूलचा दहावीचा निकाल ८८ टक्के लागला आहे. तेरणा हायस्कूलचे यशउस्मानाबाद : येथील तेरणा हायस्कूलचा ९०.४७ टक्के निकाल लागला असून परिक्षेला बसलेल्या ४२ पैकी ३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. महेश शिंदे हा ९१.२० टक्के गुण घेवून विद्यालयातून प्रथम आला आहे. महेश्वरी माळी हिने ८२ टक्के गुण मिळवून द्वितीय तर संतोष लाखाडे याने ७६ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला आहे.शिवाजी विद्यालय वाशीवाशी : येथील छत्रपती शिवाजी विद्यालयाचा शालान्त प्रमाणपत्र परिक्षेचा निकाल ८६.७१ टक्के लागला असून १५८ पैकी १३७ विद्यार्थी उत्तिर्ण झाले आहेत. यामध्ये श्वेता रगडे हिने ५०० पैकी ४७५ गुण घेऊन विद्यालयात प्रथम आली आहे. भारती पाटील हिने ४७४,योगेश्वरी कवडे हिने ४७३ गुण मिळवले आहेत. याशिवाय प्रांजली उंदरे हिने ९३.८० टक्के गुण मिळवत समजाशास्त्र या विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. जि. प. प्रशाला ईटकूरकळंब : ईटकूर येथील जि.प. प्रशालेचा दहावीचा निकाल ८२.१४ टक्के लागला असून, मनोज बापू बाबर प्रथम (९०%), पूजा अनिल शिंदे द्वितीय (८९.२०%) रोहिणी रामभाऊ गंभिरे तृतीय (८८.८०%), बाळासाहेब पांडूरंग आडसूळ (८३.६०), शितल महादेव मोटे (८०.८०) गुण घेवून यशस्वी झाले आहेत. पूजा शिंदे हीस गणितामध्ये १०० पैकी १०० गुण मिळाले आहेत. गुरुदेव दत्त हायस्कूलभूम : येथील गुरुदेव दत्त हायस्कूलचा दहावीचा ९७.५५% निकाल लागला असून, सेमीचा १००% निकाल लागला आहे. तर विशेष प्राविण्यासह ५५ विद्यार्थी, प्रथम श्रेणीत ५६ तर द्वितीय श्रेणीत ४८ विद्यार्थी आले आहेत. यामध्ये प्रतिक्षा विलास वरळे (९५.६०) ही तालुक्यात दुसरी तर मुलीत पहिली आली आहे. आदित्य सतीश मुळे (९५), सिमा श्रीमंता बागडे (९४.४०), पूजा पोपट तळेकर (९३.२०), प्रतिक्षा अरुण दराडे (९२.४०), प्रज्ञा प्रदीप गरड (९०.६०), राहा पायल निलेश (९०), अक्षय धर्मराज गायकवाड (९०), मुलाणी साजीद आलम (८९.६०) या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.शम्सुल उलुूम उर्दू हायस्कूलउस्मानाबाद : येथील शम्सुल उलूम उर्दू हायस्कूलचा दहावीचा ८४.१२% निकाल लागला असून, विशेष प्राविण्यासह ७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. तर १८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे. एकूण १२६ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी १०६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष प्राविण्यामध्ये सय्यद सफुरा सदफ, सय्यद सालेहा कौसर, शेख तनीम, शेख समरीन, काजी फैजान, शेख साना, शेख तहजीब उत्तीर्ण झाले आहेत.महात्मा फुले विद्यालयउस्मानाबाद : तालुक्यातील कोंड येथील महात्मा फुले विद्यालय कोंडचा दहावीचा परीक्षेचा ८८.५२% निकाल लागला आहे. यामध्ये शकुंतला नामदेव घोडके (९०.४०) प्रथम, पूजा बालाजी काजळे (९०.२०) द्वितीय, निखिल रमेश भोसले (८७.००) तृतीय या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.श्रीपतराव भोसले हायस्कूलउस्मानाबाद : येथील श्रीपतराव भोसले हायस्कूलचा ९५.३७ टक्के निकाल लागला असून, एकूण ११०३ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी १०५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ९० टक्के व त्यापेक्षा अधिक गुण घेऊन १३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर ३५० विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. तर ३१९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये ऋतुजा अंगद शिंदे (९७.८०), नम्रता जगदीश राजेनिंबाळकर (९७.८०), शिशिर अरविंद मोहीरे (९७.६०), आदेशकुमार दशरथ जाधव ( ९७.४०) या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.रवींद्र हायस्कूलचे यशभूम : दहावीच्या परीक्षेत येथील रवींद्र हायस्कूलचा ९७़६४ टक्के निकाल लागला असून, तेजस करळे याने ९६़६० टक्के गुण घेऊन तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे़ रवींद्र हायस्कूलमधील तेजस करळे याच्यासह प्रीतम केसकर, आकाश कांबळे, अमृता कुटे, पूजा माळवदे, उत्कर्षा पाटील, अंकिता दुधाळ, प्रशांत बोराडे, अभिजित कांबळे, वैभव क्षीरसागर, राजेश देशपांडे, प्रदिप लिमकर, प्रियंका हाके यांनी ९० टक्क्याहून अधिक गुण संपादित केले आहेत़ शाळेतील २१२ पैकी २०७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, विशेष प्राविण्यासह ६५, प्रथम श्रेणीत १०८ , द्वितीय श्रेणीत १८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत़कल्याणसागर विद्यालय परंडापरंडा : येथील कल्याणसागर माध्यमिक विद्यालयाचा ९३.२४ टक्के निकाल लागला असून, विद्यालयातील आयेशा कलीम हन्नुरे हिने ९३.२० टक्के गुण घेवून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. लक्ष्मण इंगळे याने ९३.२० टक्के गुण घेवून द्वितीय तर प्रथमेश कवडे याने ९१.८० टक्के गुण घेवून तृतीय क्रमांक मिळविला. विद्यालयातील ४८.६४ टक्के विद्यार्थी विशेष प्राविण्याने उत्तीर्ण झाले असून, २८.३७ टक्के द्वितीय श्रेणीत तर १६.२१ टक्के विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.प्रतिकूल परिस्थितीतही प्रथमेश अव्वलचपरंडा : वडीलांचा आधार नाही. आई मोलमजुरी करुन शिक्षण देते, याची जाणीव असलेल्या प्रथमेश कवडे याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ९१.८० टक्के गुण मिळवून परंड्याच्या कल्याणसागर माध्यमिक विद्यालयातून तृतीय क्रमांक पटकाविला आहे. वडीलांचे छत्र नसल्याने आजोबांच्या छायेखाली वाढलेल्या प्रथमेशने अभ्यासावर लक्ष केंद्रीत केले. आर्थिक परिस्थितीमुळे अनेक अडचणी आल्या. काहीवेळेस शिक्षण सोडावे की काय? असाही प्रश्न मनात उपस्थित झाला. मात्र कष्ट करुन मोठ्या आशेने पाहणाऱ्या आईसाठी तसेच वडीलानंतर संपूर्ण काळजी घेणाऱ्या आजोबांना चांगले दिवस दाखवावेत. याच जिद्दीने अभ्यास केल्याचे तो म्हणाला. आठवीत असतानाच शिक्षण सुटते की काय असे वाटत होते. मात्र कल्याणसागर विद्यालयाचे संस्थापक सुजीतसिंह ठाकूर यांनी परिस्थिती पाहून शिक्षणासाठी सर्व त्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या. याबरोबरच शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनामुळेच हे यश मिळाल्याचे त्याने सांगितले.‘दि रायजिंग’ स्कूल पुन्हा चमकलीउमरगा : येथील श्रमजीवी शिक्षण प्रसारक मंडळाच्या दि रायजिंग सन इंग्लिश स्कूलचा दहावी परीक्षेत सलग तिसऱ्यांदा शंभर टक्के निकाल लागला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजीचे ज्ञान आत्मसात व्हावे, या उद्देशाने संस्थेचे अध्यक्ष विनायकराव पाटील, सरचिटणीस आ. बसवराज पाटील, मारुतीराव सूर्यवंशी, रामकृष्णपंत खरोसेकर, प्राचार्य डॉ. दिलीप गरूड यांच्या पुढाकाराने सन २००२ पासून या विद्यालयाची सुरुवात करण्यात आली. भव्य इमारत, वसतिगृह सुविधा, स्कूल बस, स्विमींग पूल, अनुभवी अध्यापक वर्ग, निसर्ग सौंदर्याने नटलेला परिसर यामुळे शैक्षणिक गुणवत्ता अबाधित राहण्यास मदत झाली आहे. शुभांगी दिलीप गरूड हिने ९०.६० टक्के, तेजेस माणिकवार ९०.६०, सृष्टी बिराजदार ९० टक्के, पंकज पाटील ८९.८०, प्रज्वल होगाडे ८९.८०, सई जाधव ८९.८०, विवेक शिंदे ८९.६०, श्रीधर गरूड ८१.४, आकाश जाधव ८०.४० संदीप जगदाळे ८१.४०, पूर्वा डेधानिया ८१.२० टक्के गुण मिळवून या शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
जिल्ह्यातील विविध शाळांचे लक्षवेधी यश
By admin | Updated: June 18, 2014 01:43 IST