जयंत कुलकर्णी ।औरंगाबाद : सर्वसामान्य नागरिक व बाळगोपाळांसाठी असणाºया महानगरपालिकेच्या सिद्धार्थ स्विमिंगपूलने अवघ्या ११ महिन्यांतच ५४ लाख २0 हजार इतका उत्पन्नाचा उच्चांक गाठला आहे. विशेष म्हणजे आर्थिक वर्षाला अद्यापही एक माहिना बाकी आहे. त्यामुळे हे उत्पन्न ६0 लाखांपेक्षाही जास्त होण्याची शक्यता आहे. हा उत्पन्नाचा उंचाक महानगरपालिकेला १७ पेक्षा जास्त वर्षांत कधीही गाठता आला नाही.औरंगाबाद शहरात अनेक खाजगी जलतरण तलाव आहेत; परंतु सर्वसामान्य नागरिकांना खिशाला परवडू शकणारा आणि जलतरणाचा निखळ आनंद घेता येऊ शकेल तो महानगरपालिकेचा सिद्धार्थ जलतरण तलाव आहे. त्यामुळे उन्हाळा आला की, सर्वात जास्त नागरिक, खेळाडू आणि बाळगोपाळांचा सर्वाधिक ओढा हा मनपाच्या सिद्धार्थ जलतरण तलावाकडे असतो. सर्वसाधारणपणे खाजगी जलतरण तलावावर ४ ते ५ हजार रुपयांपर्यंत महिन्यासाठी पैसे मोजावे लागतात. मात्र, सिद्धार्थ जलतरण तलावावर स्विमिंगचा आनंद १,२00 रुपयांत घेता येऊ शकतो. त्याचप्रमाणे खाजगी जलतरण तलावात विहीर आणि बोअरिंगचे पाणी वापरले जाते, तर सिद्धार्थ जलतरण तलावावर पैठण येथील जायकवाडी धरणाचे गोडे व शुद्ध पाणी वापरले जाते. साडेतीन एकरांत असणाºया सिद्धार्थ जलतरण तलावाचीही पाण्याची क्षमता ४0 लाख आहे आणि जायकवाडी धरणाचे शुद्ध पाणी हेच स्विमिंगपूलमध्ये फिल्टर करून ते पुन्हा वापरले जाते. सध्या या जलतरण तलावावर एकूण आजीव सभासद २५५ असून, वार्षिक सभासद २७४ आहेत. त्रिमासिक सभासद २९ असून, कौटुंबिक सभासद १७ आहेत व मासिक सभासद ४0, असे एकूण ६१५ सभासद आहेत.या जलतरण तलावाच्या उत्पन्नाचा आलेख गेल्या काही वर्षांत, तर खूपच उंचावत आहे. रावसाहेब मालोदे हे व्यवस्थापक असताना १ एप्रिल २000 ते ३१ मार्च २00१ यादरम्यान जलतरणिकेचे उत्पन्न १३ लाख ६५ हजार ५२५ रुपये होते. त्यांच्या काळात २00९ पर्यंत उत्पन्न २ लाख ८१ हजारांपर्यंत होते; परंतु उत्पन्नाचा खरा ग्राफ अभय देशमुख यांनी व्यवस्थापकपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर उंचावला. १ एप्रिल २0१0 ते ३१ मार्च २0१११ दरम्यान हे उत्पन्न २१ लाख ४१ हजारांपर्यंत वाढले आणि त्यात सात्यत्याने वाढच होत गेली. २0१३ आणि २0१४ मध्ये दुरुस्तीनिमित्त मनपाचा हा जलतरण तलाव बंद होता; परंतु त्यानंतरच्या दोन वर्षांत या जलतरण तलावााचे उत्पन्न अनुक्रमे ४७ व ४२ लाखांपर्यंत गेले होते. पाण्याच्या अभावामुळे मात्र १ एप्रिल ते २0१६ व ३१ मार्च २0१७ यादरम्यान मनपाला फक्त ९ लाख ४५ हजार ७७५ इतकेच उत्पन्न झाले; परंतु याची अनेक पटीत भरपाई १ एप्रिल ते आजतागायत झाली आहे.सिद्धार्थ जलतरण तलावाच्या उत्पन्नाविषयी व्यवस्थापक अभय देशमुख यांनी सांगितले की, मनपाच्या पदाधिकाºयांचे मार्गदर्शन, अधिकाºयांचे तांत्रिक साह्य आणि स्विमिंगपुलावरील कर्मचाºयांच्या अथक परिश्रमामुळे उत्पन्नाचा उच्चांक आम्ही गाठू शकलो.सुरक्षारक्षकच नाहीविशेष म्हणजे उत्पन्नाचा उच्चांक गाठला असला तरी दुर्दैवी बाब म्हणजे मनपाला आर्थिक फायदा मिळवणाºया जलतरण तलावावर सुरक्षारक्षकच नाही.आता उन्हाळा असल्यामुळे या नेहमीप्रमाणेच स्विमिंगपूलवर खूप गर्दी होणार आहे.सुरक्षारक्षक नसल्यामुळे गर्दीला आळा घालणे तसेच फुकट्यांना रोखणे हे स्विमिंगपूल येथील कर्मचाºयांच्या हाताबाहेरचे काम असणार आहे.
सिद्धार्थ जलतरण तलावाने गाठला उत्पन्नाचा नवीन उच्चांक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 01:06 IST