शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

टंचाईच्या उपाययोजना रखडल्या

By admin | Updated: December 14, 2015 23:56 IST

लातूर : लातूर जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई जाणवत असतानाही अद्याप प्रशासनाने उपाययोजना हाती घेतल्या नाहीत़ त्यामुळे नागरिकांची होरपळ सुरू आहे़

लातूर : लातूर जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई जाणवत असतानाही अद्याप प्रशासनाने उपाययोजना हाती घेतल्या नाहीत़ त्यामुळे नागरिकांची होरपळ सुरू आहे़ याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी गांभीर्याने पाहत नसल्याने पाण्याचा अक्षरश: खेळ झाला आहे़ सर्वसामान्य नागरिकांना सांडपाणीही विकत घेण्याची वेळ आली आहे़ हेच चित्र ग्रामीण भागातही दिसून येत आहे़ दुष्काळात पाणी विकत घेऊन प्यायची वेळ आली असल्याने शासनाकडून कधी उपाययोजना होणार याकडे शहरवासियांबरोबरच संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे़ दरम्यान, पाण्यासाठी नागपुरात विधान भवनासमोर महापौरांचे धरणे आंदोलन सुरू झाले आहे.लातूर शहराला गेल्या तीन वर्षांपासून पाणीटंचाईचे चटके सुरू आहेत़ यावर्षी तीव्रता अधिक असून फेब्रुवारीनंतर शहरावासियांचे हाल होणार आहेत़ मांजरा प्रकल्पात असलेल्या पाण्यावर आणखी दोन ते अडीच महिने लातूरकरांची तहान भागणार आहे, त्यानंतर मात्र काय उपाययोजना असतील यावर अद्यापही प्रशासनाने ठोस निर्णय घेतलेला नाही़ उजनीच्या धरणातून लातूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पाणी आरक्षित करण्यात यावे़ उजनी ते लातूर शहरापर्यंत स्वतंत्र जलवाहिनी टाकण्यात यावी यासाठी लागणारा ६८८ कोटी रूपयांचा निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे़ त्याचबरोबर शासनाने २०० फुटांपेक्षा अधिक खोल विंधन विहीर घेण्यास बंदी घातली असल्याने विंधन विहिरींचाही उपयोग होत नाही़ त्यामुळे विंधन विहिरीचा नियम शिथिल करून ४५० फुट खोलीपर्यंत विंधन विहिर घेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे़ नागपूरच्या विधान भवनसमोर महापौरांसह पदाधिकाऱ्यांनीही धरणे आंदोलनात सहभाग नोंदविला आहे़ यात उपमहापौर कैलास कांबळे, स्थायी समितीचे सभापती पप्पू देशमुख, गटनेते नरेंद्र अग्रवाल, प्रभाग समितीच्या सभापती सपना किसवे, श्रीदेवी औसे, अ‍ॅड़ समद पटेल, प्रभाग समितीचे माजी सभापती प्रा़ राजकुमार जाधव, रूपाली साळुंके, केशरबाई महापुरे, उषा कांबळे आदींसह कार्यकर्त्यांचा समावेश आहे़ (प्रतिनिधी)