शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

महागाई विरोधात शिवसेना रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 00:54 IST

वाढती महागाई व कोलमडलेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या निषेधार्थ गुरुवारी शिवसेनेच्या वतीने शहरातून मोर्चा काढण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पेट्रोल, डिझेल, गॅस तसेच जीवनावश्यक वस्तूंचे वाढलेले दर यामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. असे असताना सरकार अच्छे दिनच्या नावाखाली सर्वसामाºयांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप शिवसेनेच्या पदाधिका-यांनी केला. वाढती महागाई व कोलमडलेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या निषेधार्थ गुरुवारी शिवसेनेच्या वतीने शहरातून मोर्चा काढण्यात आला. यात शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी सहभाग घेतला.शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, ए. जे. बोराडे यांच्या नेतृत्त्वाखाली शहरातील मामा चौकातून मोर्चास सुरुवात झाली. माजी आ. संतोष सांबरे, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुध्द खोतकर, किसान सेनेचे भानुदास घुगे, पांडुरंग डोंगरे, भरत मदन, माधवराव कदम, भगवान कदम, रावसाहेब राऊत, रमेश गव्हाड, परमेश्वर जगताप, मनिष श्रीवास्तव, बाबासाहेब इंगळे, भाऊसाहेब पाऊलबुध्दे, अ‍ॅड. भास्कर मगरे, सविता किवंडे या पदाधिका-यांनी या मोर्चात सहभाग घेतला. शिवसेनेचे काही पदाधिकारी बैलागाडीसह सायकल चालवत या मोर्चात सहभागी झाले. अंबिका मार्केटमध्ये मोर्चाचे रुपांतर सभेत करण्यात आले. अंबेकर म्हणाले, की जनतेच्या प्रश्नांवर बोलण्याची जबाबदारी असणारे विरोधी पक्षनेते आम्हाला सत्तेत राहून विरोध का करता, असे विचारतात. राज्यात विरोधी पक्षच राहिला नसल्याने शिवसेनेलाच विरोधी पक्षाची भूमिका बजावावी लागत आहे. शेतकरी व व्यापाºयांवर दाखल गुन्हे मागे घेण्याची मागणी त्यांनी केली. शिवाजीराव चोथे यांनी कर्जमाफीसाठी आॅनलाईन फॉर्म भरावे लागल्यामुळे शेतकºयांना त्रास झाल्याची खंत व्यक्त करत सरकारच्या धोरणावर टीका केली. जिल्हाप्रमुख बोराडे यांनी पोलीस प्रशासनाचा वचक कमी झाला असून जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे नमूद केले. मोर्चाच्या शेवटी शासनाचे प्रतिनिधी तहसीलदार विपिन पाटील यांना सर्व मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख संतोष मोहिते, हरिभाऊ पोहेकर, जयप्रकाश चव्हाण, नवनाथ दौड, माधवराव हिवाळे, बजरंग बोरसे, पंकज सोळंके, उद्धव मरकड, बाबासाहेब तेलगड, प्रसाद बोराडे, शहरप्रमुख विष्णू पाचफुले आदींनी सहभाग घेतला.