शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचा मोर्चा धडकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:38 IST

महानगरपालिकेने केलेल्या अन्यायकारक घरपट्टी आणि मालमत्ता कर वाढीच्या विरोधात सोमवारी शिवसेनेच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा काढण्यात आला

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महानगरपालिकेने केलेल्या अन्यायकारक घरपट्टी आणि मालमत्ता कर वाढीच्या विरोधात सोमवारी शिवसेनेच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा काढण्यात आला. शिवसैनिकांसह शहरातील नागरिक, व्यापारी, विविध संघटनांचे पदाधिकारी या मोर्चात सहभागी झाले होते.परभणी महापालिकेने शहरातील नागरिकांना वाढीव घरपट्टी दिली असून, त्याच जोडीला नोटिसाही बजावल्या आहेत. अनेक नागरिकांना पूर्वीच्या घरपट्टीच्या तुलनेत ३० ते ४० टक्के वाढीव घरपट्टी दिल्याने नागरिकांत संतापाची भावना निर्माण झाली आहे. या प्रश्नावर खा.बंडू जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आ.डॉ.राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी हा मोर्चा काढण्यात आला. दुपारी १२ वाजता शहरातील शनिवार बाजार येथून मोर्चाला प्रारंभ झाला. महापालिकेच्या करवाढी विरोधात घोषणा देत हा मोर्चा शिवाजी चौक, गुजरी बाजार, गांधी पार्क, अष्टभूजा देवी मंदिर, नारायण चाळ, विसावा कॉर्नर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला. दुपारी १ वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोर्चा पोहोचल्यावर त्या ठिकाणी सभेत रूपांतर झाले.यावेळी खा.बंडू जाधव, आ. डॉ.राहुल पाटील, सहसंपर्क प्रमुख डॉ.विवेक नावंदर, महिला आघाडीच्या संपर्क प्रमुख विद्याताई सरपोतदार, जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, डॉ.संजय कच्छवे, माजी आ.मीराताई रेंगे, माजी विरोधी पक्ष नेत्या अंबिका डहाळे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सूर्यकांत हाके, नगरसेवक सचिन अंबिलवादे, रिपब्लिकन पक्षाचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे, रिपाइंचे राज्य उपाध्यक्ष डी.एन. दाभाडे, गाळेधारक संघटनेचे चंद्रकांत डहाळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.या मोर्चात परभणी शहरातील महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. दुपारी उकाडा वाढला असतानाही करवाढीचा विरोध करण्यासाठी महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.शिवसेनेचे तालुकाप्रमुख नंदू अवचार, सखुबाई लटपटे, संजय गाडगे, अनिल डहाळे, नवनीत पाचपोर, विश्वास कºहाळे, सचिन गारुडी, बाबू फुलपगार, बाळराजे तळेकर, मकरंद कुलकर्णी, बापू तावडे, उद्धव मोहिते, बन्सी भालेराव, गुणाजी अवकाळे , कुसूम पिल्लेवार, उषा मुंडे आदींसह विविध संघटनांच्या पदाधिकाºयांनी मोर्चासाठी प्रयत्न केले.