शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेच्या सरपंच उषा साळे यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 23:11 IST

सरपंच उषा साळे यांच्यावर मंगळवारी १४ सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे.

वाळूज महानगर : शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या वडगाव-बजाजनगर ग्रामपंचायतीच्या सरपंच उषा साळे यांच्यावर मंगळवारी १४ सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. या प्रस्तावामुळे ऐन विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असतानाच शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.

वडगाव-बजाजनगर ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेने १७ पैकी १५ जागा मिळवून ग्रामपंचायत आपल्या ताब्यात घेतली. अपक्ष निवडून आलेल्या उषा साळे यांनी निवडणुकीनंतर शिवसेनेत प्रवेश केला.

त्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ १६ वर गेले. तत्कालीन सरपंच महेश भोंडवे यांच्यावर वर्षभरापूर्वी अविश्वास ठराव आणून उषा एकनाथ साळे यांची सरपंचपदी नेमणूक करण्यात आली. यावेळी पहिले ६ महिने उषा साळे त्यानंतरची ६ महिने सचिन गरड व शेवटची ६ महिने श्रीकांत साळे यांनी सरपंच होण्याचा तोंडी ठराव झाला होता.

परंतू सरपंच पदाचा वर्षभराचा कार्यकाळ लोटूनही साळे यांनी इतर सदस्यांना दिलेला शब्द पाळला नाही. त्यामुळे सदस्यांमध्ये सरपंच साळे यांच्या विषयी नाराजी होती. वरिष्ठांचा पाठिंबा मिळत असल्याने सरपंच साळे यांनी सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करायला सुरुवात केली. तक्रारी करुनही वरिष्ठे नेते मंडळी दखल घेत नसल्याने व ग्रामपंचायतीच्या कामाकाजात विश्वासात घेतले जात नसल्याने नाराज सदस्यांनी सरपंच उषा साळे यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी सदस्यांची जुळवा जुळव सुरु केली.

१४ सदस्यांचा प्रस्तावउपसरपंच हौसाबाई पाटोळे, सचिन गरड, श्रीकांत साळे, महेश भोंडवे, रमाकांत भांगे, वैशाली जिवरग, संगीता कासार, सुरेखा लगड, उषा हांडे, श्रीकृष्ण भोळे, मंदा भोकरे, अलका शिंदे, मोहन गिरी, अरुण वाहुळ या सदस्यांनी मंगळवारी तहसीलदार यांची भेट घेवून सरपंच उषा साळे यांच्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. या संदर्भात तहसीलदार यांनी विशेष सभेचे आयोजन करण्यासाठी संबंधितांना नोटिसा देण्याचे आदेश अधिकाऱ्यांना बजावले आहेत.

टॅग्स :WalujवाळूजPoliticsराजकारण