लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने शिवसेनेने पक्ष बांधणीच्या कामाला सुरुवात केली असून त्या अंतर्गतच शनिवारी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी परभणीत विधानसभानिहाय बैठका घेऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.पर्यावरणमंत्री रामदास कदम हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून शनिवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास त्यांचे परभणी येथे आगमन झाले. सावली विश्रामगृहावर परभणी जिल्ह्यातील चारही विधानसभानिहाय त्यांनी आढावा घेतला. सुरुवातीला पाथरी आणि जिंतूर विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर परभणी व गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचा आढावा त्यांनी घेतला. जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख आणि त्या त्या विधानसभा मतदारसंघातील सर्कलप्रमुखांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी गाव तेथे शाखाप्रमुख, महिला शाखाप्रमुख, युवासेना शाखाप्रमुख स्थापन कराव्यात. तसेच बुथ प्रमुखांची नियुक्ती करावी, अशा सूचना देण्यात आल्या. ज्या ठिकाणी मागील अनेक वर्षांपासून ग्रामीण पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्या नाहीत. तेथे दहा दिवसांत नियुक्त्या करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. एकंदर शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून शिवसेनेने पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे. या बैठकांना खा. बंडू जाधव, आ.डॉ.राहुल पाटील, सहसंपर्कप्रमुख डॉ.विवेक नावंदर, जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, जिल्हाप्रमुख डॉ.संजय कच्छवे, अॅड.प्रताप बांगर, सदाशिव देशमुख, संजय गाडगे, राजू कापसे, सखूबाई लटपटे, नंदू पाटील, नगरसेवक अतुल सरोदे, चंद्रकांत शिंदे, प्रशास ठाकूर, अनिल डहाळे, ज्ञानेश्वर पवार, नवनित पाचपोर, अर्जुन सामाले, प्रा.डॉ.पंढरीनाथ धोंडगे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
शिवसेनेकडून पक्ष बांधणीची तयारी
By admin | Updated: June 11, 2017 00:15 IST