शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेने केले मुंडण आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 23:57 IST

येथे यापूर्वी कर्जमाफी झालेल्या शेतकºयांच्या याद्या बँकेत लावण्याच्या मागणीसाठी ढोल वाजवून आंदोलन करणाºया शिवसेनेने आज जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर सरकारच्या मढ्याच्या नावाने रडापड करून दशक्रियाविधीसह मुंडण आंदोलन केले. तसेच बोंबही ठोकली. जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर शिवसेनेने आज भाजप सरकारच्या नावाने सकाळी ११ वाजता आंदोलनास प्रारंभ झाला. यावेळी जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी भाजप सरकारच्या मढ्याच्या नावाने रडापड केली

हिंगोली : येथे यापूर्वी कर्जमाफी झालेल्या शेतकºयांच्या याद्या बँकेत लावण्याच्या मागणीसाठी ढोल वाजवून आंदोलन करणाºया शिवसेनेने आज जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर सरकारच्या मढ्याच्या नावाने रडापड करून दशक्रियाविधीसह मुंडण आंदोलन केले. तसेच बोंबही ठोकली.जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर शिवसेनेने आज भाजप सरकारच्या नावाने सकाळी ११ वाजता आंदोलनास प्रारंभ झाला. यावेळी जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी भाजप सरकारच्या मढ्याच्या नावाने रडापड केली. ढोल वाजवा आंदोलन करूनही शासनाने कोणत्याच बँकेसमोर कर्जमाफी झालेल्या शेतकºयांच्या याद्या लावल्या नाहीत. त्यामुळे आज मुंडण आंदोलन केले. कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रामेश्वर शिंदे, कडुजी भवर यांचे मुंडण करण्यात आले.त्यानंतर जिल्हा उपनिबंधक सुधीर म्हेत्रेवार यांची आंदोलकांनी भेट घेतली. यावेळी म्हेत्रेवार यांना कर्जमाफीच्या प्रक्रियेबाबत माहिती विचारली. तेव्हा जिल्ह्यात ६९६ केंद्रांवरून कर्जमाफीसाठीचे अर्ज भरून घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तर दीड लाखांपेक्षा कमी कर्ज घेतलेले ६६0२५ असल्याचे सांगितले. यात ३६२ कोटी रुपयांची रक्कम त्यांच्याकडे थकित असल्याचे ते म्हणाले. तर त्यापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या खातेदारांची संख्या १0 हजार ६८७ व रक्कम २९३ कोटी असून ते या योजनेत उर्वरित हप्ते भरून लाभ घेण्यास उत्सुक असल्यास ते भरू शकतात, असेही ते म्हणाले. तर एका कुटुंबात एकालाच कर्जमाफीत लाभ मिळू शकतो, इतरांना मिळणार नाही, असे स्पष्टपणे सांगण्यात आले.यावेळी जिल्हाप्रमुख संतोष बांगर, सभापती रामेश्वर शिंदे, कडुजी भवर, सुभाष बांगर, दिलीप बांगर, राम कदम, भानुदास जाधव, दिलीप घुगे, गोपू पाटील, आनंदराव जगताप आदींसह शिवसैनिकांची उपस्थिती होती.