जालना : जालना जिल्ह्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा काढण्यात आला. दरम्यान संपूर्ण कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या शासनाने मंजूर केल्या नाही तर सत्ताधाऱ्यांना फिरणे मुश्कील करू, असा इशारा माजी राज्यमंत्री अर्जून खोतकर यांनी दिला.तालुका शिवसेनेच्या वतीने मामा चौकातून मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचा समारोप झाला. या मोर्चात शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख शिवाजीराव चोथे, जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर, ए.जे. बोराडे, माजी जि.प.अध्यक्ष अनिरूद्ध खोतकर, आ. संतोष सांबरे, जि.प. अध्यक्षा आशाताई भुतेकर, जगन्नाथ काकडे, भाऊसाहेब घुगे, भानुदास घुगे, अॅड. भास्कर मगरे, पंडितराव भुतेकर, सविताताई किवंडे, संतोष मोहिते आदी पदाधिकारी सहभागी झाले होते. शिवसेनेच्या वतीने काढण्यात आलेल्या या प्रचंड मोर्चात शेतकऱ्यांनी सरकारविरूद्ध घोषणा दिल्याने परिसर दणाणून गेला होता.जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समारोप प्रसंगी बोलताना खोतकर म्हणाले की, दुष्काळ हा शेतकऱ्यांची साथ सोडायला तयार नाही, अशा परिस्थितीत सरकारने मदतीचा हात देण्याऐवजी शेतकऱ्यांची चेष्टा चालवली आहे. उडीद, मूग, सोयाबीन, कापूस ही खरीपातील सर्व पिके जमिनदोस्त झाली आहे. शेतकऱ्यांची सर्व कर्जमाफी करण्यात यावी, शेतकऱ्यांना हेक्टरी ३० हजार रुपये आणि फळबागांसाठी ५० हजार रुपये मदत करावी, जनावरांसाठी थेट आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या नावावर जमा करावी, शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या सरकारने मंजूर कराव्यात. यावेळी अनिरूद्ध खोतकर, आ. संतोष सांबरे, जगन्नाथ काकडे, संतोष मोहिते आदींची भाषणे झाली.यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या विविध ११ मागण्यांचे निवेदन माजी राज्यमंत्री अर्जून खोतकर यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. यावेळी भानुदास घुगे, विष्णू पाचफुले, बाला परदेशी, अॅड. भास्कर मगरे, अशोक पवार, मुरलीधर शेजूळ, सुधाकर वाढेकर, गणेश कदम, अशोक खलसे, बाबुराव खरात, यादवराव राऊत, मुरलीधर थेटे, नारायण डोंगरे, सचिन भांदरगे, विलासराव सराटे, सखाराम भापकर, रखमाजी बिरले आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)
दुष्काळ जाहीर करण्यासाठी शिवसेनेचा मोर्चा
By admin | Updated: August 23, 2014 00:56 IST