शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमावर्ती राज्यांमध्ये उद्या होणारा मॉक ड्रिल पुढे ढकलला; 'ऑपरेशन शील्ड'ची नवीन तारीख लवकरच जाहीर होणार
2
पुण्यात झाड कोसळून १ ठार; कोल्हापुरात जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी भूस्खलनाच्या घटना
3
एक वर्षानंतर 'कोविड पॉझिटिव्हिटी दर जास्त, NB.1.8.1 व्हेरिएंट वाढले'; WHO ने दिला इशारा
4
शस्त्र परवान्यासाठी गोळीबाराचा बनाव; शिंदे गटाच्या युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारे यांना अटक
5
Vaishnavi Hagawane Death Case :'आमचा आमच्या मुलीवर पूर्ण विश्वास'; हगवणेंच्या वकिलांच्या युक्तीवादावर वैष्णवीच्या कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया
6
हगवणे बंधूंनी नीलेश चव्हाणच्या मदतीने केला आई, बहिणीचा मोबाईल लंपास; पोलिसांची कोर्टात माहिती
7
Rohit Sharma Gautam Gambhir, IND vs ENG: खुद्द रोहित शर्माने इंग्लंड दौऱ्यासाठी 'या' व्यक्तीबद्दल गौतम गंभीरकडे केली विनंती
8
सेबीच्या माजी अध्यक्षा माधबी पुरी बुच यांची हिंडेनबर्ग रिपोर्टच्या आरोपातून सुटका! लोकपालांनी दिली क्लीनचिट
9
आमच्याकडे ५ कोटींच्या गाड्या; आम्ही ४० लाखांच्या फॉर्च्युनरसाठी कशाला छळ करु - हगवणेंचे वकील
10
पोलिसांकडून दोषारोपपत्र दाखल करण्यास झालेल्या विलंबाची चौकशी व्हावी; महिला आयोगाचे मुख्यमंत्र्यांना पत्र
11
पाकिस्तानातील हिंदू क्रिकेटपटूचे दोन्ही पाय कापून टाकले, कारण ऐकून तुम्हालाही वाटेल वाईट
12
टॅरिफ आवश्यक, अन्यथा भारत-पाकिस्तान युद्धविराम भंग होऊ शकतो; ट्रम्प सरकारचा अमेरिकन न्यायालयात दावा
13
वैष्णवीचे एका व्यक्तीसोबत नको ते चॅट सुरु होते, म्हणून तिने...' हगवणेंच्या वकिलांचा अजब युक्तिवाद
14
ड्रोन हल्ल्यांपासून वाचण्याचे मार्ग, ऑपरेशन शील्ड' अंतर्गत उद्या या ४ राज्यांमध्ये मॉक ड्रिल होणार
15
आकडे बोलतात! 'लोकमत डॉट कॉम'ला दणदणीत 'बहुमत'; वाचकांचा विश्वास जिंकला, मराठी न्यूज वेबसाईट्समध्ये 'नंबर पहिला'
16
माजी मंत्र्याचा सचिव, पाकिस्तानला पुरवत होता गुप्त माहिती! जैसलमेरमधून पकडला गेला आणखी एक गद्दार
17
इलॉन मस्क यांना नकार देणे 'अ‍ॅपल'ला महागात पडले; आयफोन वापरकर्त्यांना ही खास सेवा मिळत नाही
18
'मला रात्री घराबाहेर काढलं', परिणय फुकेंवर प्रिया फुकेंचे आरोप; सुषमा अंधारेंनी CM फडणवीसांना केली विनंती
19
बेडरूममध्ये बसली होती सवत, बघताच पहिल्या पत्नीला संताप झाला अनावर! पुढे पतीने जे केले, ते वाचून व्हाल हैराण
20
सर्वात मोठा खुलासा; पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड...

शिवसेना-भाजप युती बॅकफूटवर

By admin | Updated: June 16, 2016 00:16 IST

औरंगाबाद : महापालिकेत सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीने मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांना चांगलेच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

औरंगाबाद : मालमत्ता कराची वसुली करण्यासाठी पोलिसांचे सहकार्य घेतल्याच्या मुद्यावर मंगळवारी महापालिकेत सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीने मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांना चांगलेच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. आयुक्तांनी जनतेची माफी मागावी अशी मागणी करण्यात येत होती. युतीची मागणी आयुक्तांनी सपशेल फेटाळून लावली. आयुक्तांना परत शासन दरबारी पाठविण्याची भाषाही करण्यात आली. बुधवारी मनपा पदाधिकाऱ्यांनी ‘अगा जे घडलेच नाही...’ प्रमाणे आयुक्तांसोबत नियमित कामकाज सुरू केले.शहरातील नागरिकांनी आणि काही व्यापाऱ्यांनी २९० कोटी रुपये मालमत्ता कराचे थकविले आहेत. थकबाकी वसूल करण्यासाठी ८ जून रोजी मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे बैठक आयोजित केली. बैठकीत थकबाकी भरावी, काही अडचण असल्यास मनपाच्या कर अदालतीत प्रश्न सुटेल असे सांगण्यात आले. थकबाकीदारांना गुन्हेगारांप्रमाणे वागणूक देण्यात आली. मनपाचा कायदा श्रेष्ठ असताना पोलिसांचे सहकार्य कशासाठी घेण्यात आले आदी मुद्दे उपस्थित करीत शिवसेना-भाजप युतीने मंगळवारी सर्वसाधारण सभेत मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. आयुक्त जेरीस येत नसल्याचे पाहून सभा बरखास्त करण्यात आली. (पान २ वर)इतिहासात प्रथमचमागील अडीच महिन्यात मनपाने २० कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल केला आहे. मनपाच्या इतिहासात एवढ्या मोठ्या प्रमाणात कर कधीच वसूल झालेला नाही. ४मागील आठ दिवसांपासून थकबाकी जमा करणाऱ्यांनीही रांग लावली आहे. बुधवारी मनपाच्या विविध वॉर्ड कार्यालयांमध्ये सुमारे १ कोटी रुपयांची वसुली करण्यात आल्याचे सूत्रांनी नमूद केले.मालमत्ता कर आॅनलाईन भरण्यासाठी एचडीएफसी या बँकेच्या सहा शाखांमध्ये यापूर्वीच सोय करण्यात आली आहे. मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी शहरातील आणखी ११ बँकांमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. बुधवारी बँक अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली. आठ दिवसांमध्ये जिथे बँक तिथे कर भरण्याची सोय उपलब्ध होईल. याशिवाय सहा वॉर्ड कार्यालयांमध्ये वसुली कर्मचाऱ्यांना कर भरण्यासाठी एक मशीन देण्यात येईल. डेबिट कार्डच्या माध्यमानेही नागरिक कर भरू शकतील.जप्तीची मोहीम 1थकबाकी आणि चालू आर्थिक वर्षाचा मालमत्ता कर जमा करण्यासाठी मनपा प्रशासन चांगलेच सरसावले आहे. ठिकठिकाणी जप्तीची कारवाई करण्यात येत आहे. बुधवारी मनपाच्या रेल्वेस्टेशन व्यापारी संकुल येथील एकूण ७ दुकानांना सील ठोकण्यात आले. 2व्यापाऱ्यांकडून ४ लाख ६१ हजार रुपये थकबाकी वसूल केल्यानंतर सील उघडण्यात आले. ही कारवाई उपायुक्त अय्युब खान यांच्या मार्गदर्शनाखाली नगररचना सहसंचालक वसंत निकम, मालमत्ता अधिकारी ए. बी. देशमुख, वामन जोगदंड, हसन खान, हरिभाऊ पवार, शिवाजी ढोके, सचिन गायकवाड, शेख जाकेर, शेख सालम आदींनी केली. ...म्हणून घेतली नरमाईची भूमिकाआयुक्तांना सर्वसाधारण सभेत कोंडीत पकडण्यासाठी मोजकेच नगरसेवक सरसावले होते. पदाधिकारी वारंवार प्रशासनाची बाजू घेत होते. कारण २३ जूनपासून शहर विकास आराखड्याची सुनावणी घेण्यात येणार आहे. आयुक्तांशी पंगा घेतल्यास भविष्यात आपल्यालाच त्रास होईल, याची जाणीव पूर्णपणे पदाधिकाऱ्यांना आहे. त्यामुळे त्यांनी नरमाईची भूमिका घेतली.