अभिनेत्री शिल्पा शेट्टीने आपली बहीण शमितासोबत वर्कआऊट करतानाचा एक भन्नाट फोटो सोशल मीडियावर अपलोड केला आहे. हा फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून, यात शिल्पा योगा मॅटवर झोपलेली आहे आणि तिने आपल्या दोन्ही पायांवर शमिताला उचलून घेतलेलं दिसून येत आहे, तर शमिताचे हात शिल्पाच्या हातात आहेत. या फोटोला शिल्पाने शानदार कॅप्शन देखील दिलं आहे. ‘मनातून आपण लहानच आहोत. हीदेखील खूप मोठी कला आहे, लक्षात ठेव, लव्ह यू.’
मलायकासाठी अर्जुनच झाला फोटोग्राफर
कुटुंबासोबत ख्रिसमस साजरा केल्यावर मलायका अरोरा आता तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबत गोव्यातल्या बीचवर सुट्या एन्जॉय करते आहे. मलायकाची बहीण अमृता अरोरा हीसुद्धा तिच्यासोबत आहे. दरम्यान, अमृताने या लव्हबर्ड्सचा एक व्हिडिओ शेअर केला. व्हिडिओत बीचवरच्या स्वीमिंगपूलमध्ये मलायका ग्रिनिश मोनोकिनी आणि ऑरेंज कलरचा श्रग घालून पोज देते आहे, तर अर्जुन मलायकाचे फोटो काढण्यात मग्न झालेला दिसतो आहे.