शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

खून प्रकरणात सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:17 IST

नांदेड: किरकोळ कारणावरुन झालेल्या मारहाणीत राजू पांडुरंग बल्लेवाड यांचा मृत्यू झाला़ या प्रकरणात प्रथमवर्ग न्यायाधीशांनी आरोपी नारायण हुलाजी हुल्लेवाड यास सात वर्षे सक्तमजुरी

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: मुदखेड तालुक्यातील बारड -भोकरफाटा रस्त्यावर किरकोळ कारणावरुन झालेल्या मारहाणीत राजू पांडुरंग बल्लेवाड यांचा मृत्यू झाला़ या प्रकरणात प्रथमवर्ग न्यायाधीशांनी आरोपी नारायण हुलाजी हुल्लेवाड यास सात वर्षे सक्तमजुरी आणि एक हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे़ राजू पांडुरंग बल्लेवाड व त्याचा मावसभाऊ कृष्णा लिंगोजी बिलेवाड हे दोघेजण बारड बसस्थानकासमोर आॅटोची वाट पाहत थांबले होते़ त्यावेळी आरोपी नारायण हुलाजी बल्लेवाड (रा़पांडुर्णा ता़भोकर) त्या ठिकाणी आला़ त्याने राजू बल्लेवाड याला उद्देशून लंगड्या इथे कुठे फिरतोस असे म्हणून हिणविले़ त्यावर राजू बल्लेवाड हे त्याला जाब विचारण्यासाठी जवळ गेले असता, आरोपी नारायण याने राजू याच्या कानशिलात लगावली़ त्यानंतर खाली पडलेल्या राजू याच्या छातीवर बसून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली़ त्यानंतर जखमी राजू घरी गेला़ २० जून रोजी अधिक त्रास होत असल्याने त्याला नांदेड शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ या ठिकाणी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़ याप्रकरणी पांडुरंग नारायण बल्लेवाड यांच्या तक्रारीवरुन बारड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता़ या प्रकरणाचा तपास पोनि़ विवेकानंद पाटील यांनी करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले़ सरकार पक्षाच्या वतीने १३ साक्षीदार तपासण्यात आले़ प्रमुख जिल्हा न्यायाधीश सविता बारणे यांनी नारायण हुलाजी हुल्लेवाड याला सात वर्षे सक्तमजुरी आणि एक हजार रुपयांचा दंड ठोठावला़ सरकारच्या वतीने अ‍ॅड़डी़जी़ शिंदे यांनी बाजू मांडली़