शहरं
Join us  
Trending Stories
1
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
2
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
3
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
4
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
5
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
6
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
7
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
8
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
9
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
10
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
11
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
12
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
13
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
14
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
15
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
16
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
17
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
18
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
19
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
20
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल

‘सेतू’ चा उडणार फज्जा

By admin | Updated: May 30, 2016 01:15 IST

औरंगाबाद : बारावीचा निकाल लागल्यानंतर विविध प्रमाणपत्रे काढण्यासाठी पालक, विद्यार्थ्यांची सेतू सुविधा केंद्रात एकच गर्दी होत आहे

औरंगाबाद : बारावीचा निकाल लागल्यानंतर विविध प्रमाणपत्रे काढण्यासाठी पालक, विद्यार्थ्यांची सेतू सुविधा केंद्रात एकच गर्दी होत आहे. दहावीचा निकाल लागल्यानंतर तर जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतूचा पूर्ण फज्जा उडण्याची शक्यता आहे. कारण महा ई- सेवा केंद्राकडे सध्या सेतू असून, नियोजनाअभावी प्रत्येक प्रमाणपत्राचे वेगळे काऊंटर तेथे सुरू आहे. नऊ महिन्यांपासून जिल्हा प्रशासनाला या प्रकरणात निर्णय घेता येत नसल्याचे दिसते आहे. सध्या सेतूची यंत्रणा पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे. दलाल ठाण मांडून नागरिकांना गाठून पंधरा मिनिटांत प्रमाणपत्र देण्याचे सांगून त्यांच्याकडून रक्कम उकळत आहेत. जिल्हा प्रशासन हे निमूटपणे पाहत आहे. सेतू सुविधा केंद्राचा ठेका देण्याचा घोळ नऊ महिन्यांपासून सुरू असून, प्रशासनाने महा ई-सेवा केंद्राला सेतू केंद्र चालविण्यास दिले. यांच्यात होती स्पर्धा....सेतू सुविधा केंद्र्राचा ठेका घेण्यासाठी गुजरात इन्फोटेक, जेएमके इन्फो सॉफ्ट लि., कारवी डेटा मॅनेजमेंट, पेंटागॉन सर्व्हिसेस स्पर्धेत होते. निवडीसाठी तांत्रिक मूल्यमापन समिती नेमण्यात आली. गुजरात इन्फोटेकला कमी गुण मिळाले. गुजरात इन्फोटेकने जेएमकेच्या दोन संस्थांच्या अनुभवाबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे आक्षेप दाखल केले, तसेच न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर जेएमकेला जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरविले. या निर्णयाविरोधात जेएमकेने न्यायालयात धाव घेतली. सेतू सुविधा केंद्राचा ठेका मिळविण्यासाठी प्रशासनावर राजकीय दबाव आहे. या दबावातूनच गुजरात इन्फो.ला ठेका देण्यात आला; परंतु त्या विरोधात जेएमके इन्फोने कोर्टात धाव घेतल्याने सगळे प्रकरण लांबले आहे. न्यायालयाने जेएमकेच्या अनुभवाबाबतचा मुद्दा निकाली काढत जिल्हाधिकाऱ्यांनी गुजरात इन्फोच्या बाजूने दिलेले आदेश रद्दबातल ठरविले. आता पुन्हा पुनर्मूल्यांकन करण्याची धडपड प्रशासनाने सुरू केली आहे. प्रशासनाने जेएमके व गुजरातची एनओसी मागितल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. मार्च २०१६ मध्ये औरंगाबाद जिल्ह्यातून दहावीला ६४ हजार ६६८ विद्यार्थी बसले. या आठवडाअखेरपर्यंत निकाल लागण्याची शक्यता आहे. यातील सुमारे ७० टक्के विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण आणि शैक्षणिक शुल्क माफीसाठी सेतू सुविधा केंद्रातून प्रमाणपत्र काढण्यासाठी यावेच लागेल. सेतूचे नियोजन कोलमडलेले असल्यामुळे व सध्या तेथे प्रत्येक प्रमाणपत्र देण्यासाठी ‘बाजार’ भरल्याप्रमाणे स्टॉल्स लागलेले आहेत. त्यामुळे पालकांना आणि उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हा प्रशासनाने केंद्राचा ठेका कुणालाही द्यावा. किंवा महा-ई-सेवेकडेही ते काम ठेवले तर हरकत नाही; परंतु नागरिकांना, विद्यार्थ्यांना त्यातून पारदर्शक आणि वेळेत सुविधा मिळणे अपेक्षित असल्याची मागणी जोर धरीत आहे.