शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

नागसेनवनात स्वायत्त विद्यापीठ स्थापन करावे

By admin | Updated: July 9, 2014 00:52 IST

औरंगाबाद : नागसेनवनमधील शैक्षणिक संस्थांमध्ये विविध विद्याशाखांचे हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

औरंगाबाद : नागसेनवनमधील शैक्षणिक संस्थांमध्ये विविध विद्याशाखांचे हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. नागसेनवनात एक स्वतंत्र स्वायत्त विद्यापीठ स्थापन करावे, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागाचे प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर यांनी केले. पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या ६९ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी न्यायमूर्ती एच. एम. साळवे होते. व्यासपीठावर प्राचार्या डॉ. वैशाली प्रधान, प्राचार्य डॉ. एस. के. हिंगोले, प्राचार्य डॉ. मोहम्मद शफिक, प्राचार्य राहुल मोरे, डॉ. भदन्त एस. सत्यपाल, मुख्याध्यापिका ए. पी. गोलकोंडा, जयश्री घोबले आदींची उपस्थिती होती. डॉ. धारूरकर म्हणाले की, भारतीय राज्यघटनेचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पीईएसची निर्मिती केली. ही सोसायटी केवळ शैक्षणिक संस्था नव्हे तर ती शिक्षणाची एक चळवळ म्हणून पुढे आली. आजपर्यंत या सोसायटीतून लाखो विद्यार्थी शिक्षण घेऊन देशात विविध उच्च पदांवर कार्यरत आहेत. बाबासाहेबांना देशातील समस्यांची जाणीव होती. त्यासाठीच त्यांनी शिक्षणाचे हे रोपटे लावले होते. आज त्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे. आगामी काळात या परिसरात स्वायत्त विद्यापीठ स्थापन व्हावे व त्यात देश- विदेशातील विद्यार्थी शिक्षण- संशोधनासाठी यावेत. हा परिसर सतत हरित राहावा, त्यासाठी दरवर्षी या परिसरात किमान १ हजार झाडे लावावीत. अध्यक्षीय समारोप करताना माजी न्यायमूर्ती साळवे म्हणाले की, आपण फक्त बोलतो, कृती मात्र करीत नाहीत. त्यामुळे संघटित होऊन बाबासाहेबांचे विचार आचरणात आणावेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. हिंगोले यांनी केले. सूत्रसंचालन दीक्षा काळे हिने केले. प्रा. व्ही. एन. पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमात पीईएसमधील सेवानिवृत्त प्राध्यापक, कर्मचारी, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.