शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

शंभर ग्रामपंचायतींची आयएसओसाठी निवड

By admin | Updated: September 7, 2014 00:30 IST

परभणी : जिल्ह्यातील शंभर ग्रामपंचायतींची आयएसओेसाठी निवड करण्यात आली

परभणी : जिल्ह्यातील शंभर ग्रामपंचायतींची आयएसओेसाठी निवड करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम़ व्ही़ करडखेडकर यांनी दिली़ ग्रा़ पं़ कामकाज सुधारण्याच्या दृष्टिकोनातून शासनस्तरावरून विविध उपाययोजना केल्या जात आहेत़ यासाठी निधीही उपलब्ध करून दिला जात आहे़ हळूहळू ग्रामपंचायतींच्या कामकाजामध्येही बदल होत आहे़ त्याच अनुषंगाने जिल्ह्यातील १०० ग्रामपंचायतींना आयएसओ मिळावा, यासाठीचे प्रयत्न जिल्हा परिषदेने चालविले आहेत़ यासंदर्भात माहिती देताना जि़प़च्या पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी करडखेडकर यांनी सांगितले की, जिल्ह्यातील नऊही तालुक्यांमधील शंभर ग्रामपंचायतींची यासाठी निवड करण्यात आली आहे़ आयएसओ मिळविण्यासाठी या ग्रामपंचायतींमध्ये वृक्षारोपण, ग्रामपंचायत इमारत, कर वसुली, स्वच्छता अभियान, सांडपाणी व्यवस्थापन, प्रिया, संग्राम सॉफ्टवेअरमधील माहितीची नोंद, ड्रेस कोड, बायोमेट्रीक प्रणालीवर उपस्थिती, हिरकणी योजनेची अंमलबजावणी, सर्व कर्मचाऱ्यांना ओळखपत्रांचे वाटप, सामाजिक एकता दर्शविणारे कार्यक्रम, जन्म-मृत्यू नोंदणी, नियमित ग्रामसभा आदी एकूण ५३ मुद्यांची पूर्तता संबंधित ग्रामपंचायतींना करावी लागणार आहे़ यासाठी संबंधित ग्रामसेवकांचे प्रशिक्षण घेण्यात आले असून, आता गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी आदींचे प्रशिक्षण लवकरच घेण्यात येणार असल्याचे करडखेडकर म्हणाले़ (जिल्हा प्रतिनिधी)