शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यूसदृश्य तापाचा दुसरा बळी

By admin | Updated: September 1, 2014 01:06 IST

फकिरा देशमुख/बाळू मोकासरे , भोकरदन/वालसावंगी गेल्या आठ-दहा दिवसांपासून भोकरदन तालुक्यातील वालसावंगी गावात डेंग्यूसदृश्य तापाने थैमान घातले असून आतापर्यंत डेंग्यूसदृश्य तापाने

फकिरा देशमुख/बाळू मोकासरे , भोकरदन/वालसावंगीगेल्या आठ-दहा दिवसांपासून भोकरदन तालुक्यातील वालसावंगी गावात डेंग्यूसदृश्य तापाने थैमान घातले असून आतापर्यंत डेंग्यूसदृश्य तापाने भाऊ-बहिणीचा बळी गेल्याने गावातील नागरिक भयभीत झाले आहेत. मात्र दुसरीकडे आरोग्य विभाग बेफिकिर असून अद्यापही या गावात पथक दाखल झालेले नाही. गेल्या आठ-दहा दिवसांपासून गावात तापाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत २५-३० रुग्ण तापाने फणफणत आहेत. २१ आॅगस्ट रोजी निवृत्ती उर्फ राजेंद्र भालचंद्र गावंडे (वय ५) यास तापामुळे बुलढाणा येथील रुग्णालयातून औरंगाबाद येथे अधिक उपचारासाठी नेण्यात येत असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. तर ३१ आॅगस्ट रोजी निवृत्तीची बहिण अश्विनी भालचंद्र गावंडे (वय ७ वर्षे) हिचाही डेंग्यूसदृश्य तापाने औरंगाबाद येथील एका खाजगी रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या दोन्ही घटनांमुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. मात्र या प्रकारानंतरही आरोग्य विभागाच्या स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तात्पुरत्या स्वरूपाचे उपचार केले जात असल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. गावातील एका हातपंपास दूषित पाणी असल्याने काही जणांना ताप आल्याचा दावा आरोग्य विभागातर्फे केला जात आहे. गावात डासांचे प्रमाण वाढल्याने धूर फवारणी करणे आवश्यक आहे. आरोग्य पथक अद्याप गावात दाखल झालेले नाही. मात्र गावात तापाचे रुग्ण वाढत असून परिणामी ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. पद्मावती हे पुनर्वसित गाव तलावाच्या काठावर आहे. सध्या पावसाळा असल्याने गावात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे तापाची लागण सुरू झाली आहे. हा ताप डेंग्यूसदृश्य असल्याचा संशय ग्रामस्थांमधून व्यक्त केला जात आहे, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्यास दुजोरा मिळालेला नाही. दरम्यान, गावात आणखी २५-३० रुग्ण तापाने फणफणले असून आरोग्य विभागाने अद्यापही सतर्कता दाखविलेली नाही, असे सरपंच रमेश तराळ, कल्याण तराळ यांनी सांगितले. याबाबत वैद्यकीय अधिकारी अनिल वाघमारे म्हणाले, या भावंडांचा मृत्यू तापाने झाला. त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहे. त्यामुळे ताप कोणत्या प्रकारचा आहे, हे वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्याशिवाय सांगता येणार नाही, असेही ते म्हणाले.मयत मुलांचे वडील भालचंद्र गावंडे हे मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांना अश्विनी व निवृत्ती ही दोनच अपत्ये होती. दोन अपत्यांवर त्यांनी नसबंदी करून घेतली होती. मात्र या दोन्ही अपत्यांचा तापाच्या आजाराने मृत्यू झाला. त्यामुळे त्यांचा संसार कोलमडल्यासारखा झाला आहे. या प्रकारामुळे गावातही शोककळा पसरली आहे. ४गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून पद्मावती गावातील रोहित्र वारंवार जळाल्याने सध्या गाव अंधारात आहे. अंधारामुळेच गेल्या आठवड्यात एका वृद्धाचा साप चावून मृत्यू झाला. मात्र या पार्श्वभूमीवर महावितरणने गावात नवीन रोहित्र बसविलेले नाही.