शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

पळवून नेले; लग्न केले; मुलगी झाली अन् पुढे...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:43 IST

अल्पवयीन मुलीला पेंटींग काम करणाºया मुलाने पळवून नेले. तिच्यासोबत आळंदीमध्ये लग्नही केले. त्यानंतर त्यांना एक गोंडस चिमुकलीही झाली. परंतु तिच्या आईने अपहरणाचा गुन्हा नोंदविला असल्याने अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने या जोडप्याला पुण्यात पकडले.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : अल्पवयीन मुलीला पेंटींग काम करणाºया मुलाने पळवून नेले. तिच्यासोबत आळंदीमध्ये लग्नही केले. त्यानंतर त्यांना एक गोंडस चिमुकलीही झाली. परंतु तिच्या आईने अपहरणाचा गुन्हा नोंदविला असल्याने अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने या जोडप्याला पुण्यात पकडले. सैराट जोडप्यासह पथक बीडकडे रवाना झाले. ही कारवाई शुक्रवारी सकाळी करण्यात आली.साधारण साडे तीन वर्षांपूर्वी १७ वर्षिय अल्पवयीन मुलीला गल्लीतीलच पेंटींग काम करणाºया एका २१ वर्षीय मुलाने पळवून नेले होते. त्यानंतर मुलीच्या आईने बीड शहर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. शहर पोलिसांनी तपास केला परंतु त्यांना ते मिळून आले नाहीत.मग हा तपास आठ महिन्यांपूर्वी अवैध मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाकडे आला. पोलीस उपनिरीक्षक दीपाली गित्ते यांनी तपासाची चक्रे गतीने फिरविली. संपूर्ण टिम कामाला लागली. मुलगा पेंटींग काम करीत असल्याने त्याच्या क्षेत्रातील बीडसह औरंगाबाद, पुणे आदी ठिकाणी चौकशी केली. हे जोडपे पुण्यात राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर टिम पुण्यात दाखल झाली. परिसरात चौकशी करून खात्री पटताच त्यांनी झडप घालत या जोडप्याला पेठ (ता. अंबेगाव जि.पुणे) पकडले. या जोडप्याला घेऊन पथक बीडला रवाना झाले असून बीड शहर पोलिसांच्या स्वाधिन त्यांना केले जाणार आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपाली गित्ते, आप्पासाहेब सानप, शिवाजी भारती, शेख शमिम पाशा, सतीश बहिरवाळ, रेखा गोरे, नीलावती खटाणे, सोनाली चौरे, विकास नेवडे आदींनी केली.