शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

मनपा ठोकणार गाळ्यांना सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 00:18 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार मनपा प्रशासन शहरातील ३०० गाळ्यांना पोलीस बंदोबस्तात सील ठोकणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार मनपा प्रशासन शहरातील ३०० गाळ्यांना पोलीस बंदोबस्तात सील ठोकणार आहे. गुरुवार १७ आॅगस्टपासून ही कारवाई सुरू होणार असून, २१ आॅगस्ट रोजी कारवाईचा अहवाल खंडपीठात सादर करण्यात येणार आहे. ज्या व्यापाºयांच्या गाळ्यांना सील ठोकायचे आहे, त्यांना नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत.शहरात महापालिकेच्या मालकीचे २० पेक्षा अधिक व्यापारी संकुल आहेत. मागील ३० वर्षांमध्ये मनपाने कोट्यवधी रुपयांच्या या संकुलांकडे अजिबात लक्ष दिले नाही. मनपाच्या गाळ्यांमध्ये कोणते भाडेकरू आहेत, ते दरवर्षी करारानुसार भाडे भरतात किंवा नाही, अनधिकृतपणे या गाळ्यांमध्ये कोणी ठाण मांडले हेसुद्धा पाहण्याची तसदी प्रशासनाने घेतली नाही. २००८ मध्ये मनपाच्या गाळ्यांसंदर्भात खंडपीठात सुमोटो याचिका (क्रमांक- ६९८९) दाखल झाली. या याचिकेच्या वेळोवेळी सुनावण्या झाल्या. प्रत्येक सुनावणीच्या वेळी मनपाने एक नवीन शपथपत्र दाखल करून वेळकाढू धोरण स्वीकारले. खंडपीठाच्या ही बाब निदर्शनास येताच मागील महिन्यात खंडपीठाने थेट ३०० गाळेधारकांवर कारवाई करा, असे आदेश ४ जुलै २०१७ रोजी न्या. एस. सी. धर्माधिकारी, न्या. मंगेश पाटील यांच्या खंडपीठाने दिले. कारवाईचा अहवाल खंडपीठाला सादर करा, अशी तंबीही मनपाला दिली. खंडपीठाच्या आदेशाने मनपा प्रशासन चांगलेच हादरले. मागील एक महिन्यापासून जुन्या फायली शोधण्यात येत होत्या. सर्व गाळेधारकांच्या फायली शोधून ३०० गाळेधारकांची यादी तयार करण्यात आली. वर्षानुवर्षे पैसे न भरणाºया, करार संपलेल्या, अनधिकृतपणे गाळे बळकावून व्यवसाय करणाºयांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. गुरुवार १७ आॅगस्टपासून मनपा गाळे सील करणार आहे. या कामासाठी मोठा पोलीस बंदोबस्तही मागविण्यात आला आहे. मागील एक महिन्यापासून मनपाच्या मालमत्ता विभागाकडे गाळेधारकांनी पैसे भरण्यासाठी अक्षरश: रांग लावली आहे. मनपा संबंधितांकडून जुनी थकबाकीही भरून घेत आहे.