शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

नोटा बदली प्रकरणावर अखेर पडदा

By admin | Updated: July 13, 2017 01:04 IST

औरंगाबाद : एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागात जुन्या पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा बदली प्रकारावर अधिकाऱ्यांनीच पडदा टाकला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागात जुन्या पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा बदली प्रकारावर अधिकाऱ्यांनीच पडदा टाकला आहे. चौकशीमध्ये त्रुटी आढळून कोणावरही कारवाई झालेली नाही. कोणताही गैरप्रकार झाला नसल्याचा दावा केला जात आहे.जुन्या पाचशे आणि एक हजारांच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयानंतर एसटी महामंडळातील काहींनी प्रवाशांकडून आलेल्या नोटांची रक्कम काढून घेऊन पाचशे, एक हजारांच्या नोटांचा भरणा केला. हा प्रकार ‘लोकमत’ने समोर आणल्यानंतर याप्रकरणी चौकशी करण्यात आली. यात लेखा अधिकारी आणि विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे सिडको बसस्थानकातील रोकड शाखेची तपासणी केली होती. यामध्ये ८ ते ११ नोव्हेंबर या कालावधीत रोखपालांकडे वाहकांनी दिलेल्या नोटा तसेच आरक्षण, पासेस आदींच्या माध्यमातून आलेल्या नोटा व बँकेत भरणा झालेल्या नोटांची पडताळणी केली. त्यांचा तुलनात्मक विचार करता त्यामुळे त्रुटी आढळल्याचे विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांनी नमूद केले. परंतु याबाबतीत जबाब घेतल्यावर रोखपालांना मात्र क्लीन चिट देण्यात आली. रोखपालांनी जबाबात म्हटले की, नोटाबंदीच्या निर्णयानंतर प्रवासी वाहकांकडे एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटाच देत होते. त्यामुळे वाहकांना पैशांची देवाण-घेवाण करण्यासाठी अडचण निर्माण होत होती. सिडको बसस्थानकात इतर विभागांच्या अनेक बसेस येतात. या बसेसचे वाहक कमी मूल्याच्या नोटा घेण्यासाठी रोकड शाखेत येत होते. एसटी महामंडळाचेच कर्मचारी असल्यामुळे आम्ही त्यांना नोटा बदलून दिल्याचे रोखपालांनी जबाबात सांगितले. कोणताही गैरप्रकार झाला नसल्याने कोणावरही कारवाई झाली नसल्याचे विभाग नियंत्रक आर. एन. पाटील यांनी सांगितले.