शहरं
Join us  
Trending Stories
1
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
2
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
3
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
4
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
5
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
6
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
7
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
8
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
9
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत आवळळ्या मुसक्या   
10
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
11
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
12
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
13
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
14
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
15
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीला करा तुळशीचे 'हे' उपाय आणि पूजन, ते ठरेल इच्छापूर्तीचे साधन!
16
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
17
Raj Thackeray Udddhav Thackeray Family Photo : संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
18
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल
19
रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; एकाचा मृत्यू, २६ जण जखमी
20
"मुंबईत सत्तेत असताना मराठी माणसाला हद्दपार केलं आणि आता सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा..."

शाळकरी मुलीस पळवणाऱ्या सातही आरोपींना पकडले

By admin | Updated: September 13, 2014 00:09 IST

वसमत : तालुक्यातील गिरगाव येथील अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवणाऱ्या तरुणासह सातही आरोपींना कुरूंदा पोलिसांनी अटक केली आहे.

वसमत : तालुक्यातील गिरगाव येथील अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवणाऱ्या तरुणासह सातही आरोपींना कुरूंदा पोलिसांनी अटक केली आहे. पळवून नेलेल्या मुलीचा शोध घेऊन २४ तासाच्या आत आरोपी गजाआड करण्याची कामगिरी पोलिसांनी केली. तपासात ‘व्हॉटस्अप’चा आधार घेवून मुलीसह तरुणास मनमाड येथे ताब्यात घेण्यात आले.वसमत तालुक्यातील गिरगाव येथे इयत्ता आठवीत शिकणाऱ्या १३ वर्षीय मुलीस गावातीलच २५ वर्षीय तरुणाने १० सप्टेंबरच्या रात्री फुस लावून पळवून नेले होते. सदर प्रकरणी मुलीच्या वडिलाने दिलेल्या तक्रारीवरून सात जणांविरोधात गुन्हा नोंदवला होता. अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याची घटना घडल्याने ग्रामस्थांत संतापाचे वातावरण होते. कुरूंदा पोलिसांनी घटनेचे गांभीर्य पाहून तपासाची चक्रे वेगाने फिरवली. निळा (जि.नांदेड) येथील आरोपीचे मित्र व गुन्ह्यातील आरोपी असलेल्या गणपत जोगदंड, माधव जोगदंड व विजय जोगदंड यांना अटक करून माहिती काढण्यास सुरूवात केली असता आरोपी ज्ञानेश्वर कऱ्हाळे यास सदरील मित्रांनी पूर्णा रेल्वेस्थानकावरून दीक्षाभूमी एक्सप्रेसमध्ये बसवून दिल्याचे समोर आले.पोलिसांनी मोबाईल लोकेशन घेतले असता मनमाड येथे हे दोघे असल्याचे समोर आले. कुरूंदा पोलिसांनी व्हॉटस्अपवर मुलगा व मुलीचा फोटो मनमाड पोलिसांना पाठविला व त्या आधारे मनमाड पोलिसांनी मुलाला सदर मुलीसह ताब्यात घेतले आणि त्यांनी कुरूंदा पोलिसांना कळवले. २४ तासाच्या आत मुलगी पोलिसांच्या ताब्यात आल्याने तणाव निवळण्यास मदत झाली. गुरूवारी सायंकाळपर्यंत पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली होती.सहावा आरोपी चिमनाजी कऱ्हाळे हा गिरगाव येथील मळ्यात असल्याची खबर ग्रामस्थांना लागल्याने त्यांनी त्यास पकडले व पोलिसांना खबर दिली. गिरगाव येथे डीवायएसपी पियूष जगताप, पोनि नानासाहेब नागदरे दाखल झाले ग्रामस्थांनी आरोपी पोलिसांच्या ताब्यात दिला. ग्रामस्थांनी मुलीला पळवून नेण्याच्या घटनेत पोलिसांनी कडक भूमिका घेवून आरोपीवर जरब बसेल अशी कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. पोनि नागदरे यांनी, अशा घटना घडल्या तर पोलिसांना विश्वासाने सांगण्यात मुलीचे नाव उघड होवू न देता कारवाई होईल, असे आश्वासन दिले. २४ तासाच्या आत या प्रकरणाचा तपास कुरूंदा पोलिसांनी केल्याने पोलिसांच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त होत आहे.या प्रकरणात पोनि नानासाहेब नागदरे, सपोनि यशवंत कदम, जमादार बी.टी. केंद्रे, राठोड, चव्हाण आदी कर्मचाऱ्यांसह मनमाड पोलिसांनी महत्वाची भूमिका बजावली. (वार्ताहर)