शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लोकवर्गणीतून शाळा डिजिटल

By admin | Updated: July 7, 2016 23:42 IST

सुनील चौरे, हदगाव चिंचगव्हाण येथील जिल्हा परिषदेची केंद्रीय शाळा लोकवर्गणीतून व शिक्षकाच्या मदतीने संगणकीकृत झाली़

सुनील चौरे,  हदगाव चिंचगव्हाण येथील जिल्हा परिषदेची केंद्रीय शाळा लोकवर्गणीतून व शिक्षकाच्या मदतीने संगणकीकृत झाली़ केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे, या उक्तीप्रमाणे गतवर्षी जून ते एप्रिल या १० महिन्यात ९८ शाळा डिजिटल करण्यात आल्या़ यामध्ये सभापती बालासाहेब कदम, तत्कालीन गटशिक्षणाधिकारी बी़वाय़ येरपुलवार, सूर्यकांत बाच्छे यांचे विशेष योगदान होते़ खरे तर १०० वी शाळा डिजिटल करण्याचा मान तळणी येथील शाळेला पालकमंत्र्यांच्या हस्ते १ मे ला होणार होती़ पण ऐनवेळी कार्यक्रम रद्द झाला आणि हा क्रमांक चिंचगव्हाणच्या शाळेने मिळविला़ लोकवर्गणीतून १ लाख ९० हजार रुपये निधी जमा करून शाळेची रंगरंगोटी, बोलक्या भिंती, ज्ञानरचनावादाचे साहित्य व डिजिटलचे साहित्य शाळेने घेतले़ येथील श्क्षिक अमीर शेख यांनीही शाळेला इतर शाळेच्या तुलनेत टिकविण्यासाठी प्रयत्न केले़ सध्या युगच तंत्रज्ञानाचे आहे़ त्यामुळे विद्यार्थी पुस्तक, वह्याऐवजी या यंत्रामुळे जास्त एकरूप होतात़ इतिहास अथवा विज्ञान याचे वेगवेगळे प्रयोग अ‍ॅपस्वरून डाऊनलोड करून विद्यार्थ्यांना दाखविल्यामुळे त्यांच्या आकलन क्षमतेत वाढ होते व ते शाळेला दांडी मारण्याचे टाळतात़ तंत्रज्ञान वापरण्याची कला शिकवितात़ त्यामुळे विद्यार्थी व शिक्षक यांच्यात मैत्री होते़ याचा चांगला परिणाम शाळेच्या गुणवत्तेवरही होतो़आतापर्यंत झालेल्या डिजिटल शाळेमध्ये विद्यार्थ्यांची गळती थांबली आहे़ अवघड शब्द, मोठमोठ्या संख्या, विद्यार्थी ज्ञानरचनावादच्या साहित्यामुळे न अडखडता वाचू लागली आहेत़ यामुळे विद्यार्थी, पालक व शिक्षकांनाही समाधान मिळत आहे़ या कार्यक्रमाला आ़नागेश पाटील यांनी मार्गदर्शन केले व संरक्षण भिंतीसाठी निधी देण्याचे आश्वासन दिले़ सभापती बालासाहेब कदम, जि़प़सदस्या सुनिता हाराळे, पंचायत समिती सदस्या पूष्पा देशमुखे, लांडगे, माजी जि़प़सदस्य उमेश मामीडवार, उपसरपंच, सदस्य आदी उपस्थित होते़