शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

शालेय मुलींना सायकलींची प्रतीक्षा

By admin | Updated: July 14, 2017 00:23 IST

नांदेड : रक्कम विद्यार्र्थिनींच्या खात्यावर वर्ग झाली नसल्याने १०२० पात्र लाभार्थी विद्यार्थिनींना सायकलीची प्रतीक्षा करावी लागत आहे़

श्रीनिवास भोसले। लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्ह्यातील नऊ तालुक्यांचा मानव विकास कार्यक्रमामध्ये समावेश करण्यात आला आहे़ या कार्यक्रमाअंतर्गत शालेय विद्यार्थिनींना सायकल देण्यासाठी २०१६-१७ मध्ये मागविलेल्या प्रस्तावांना जिल्हा नियोजन समितीमार्फत प्रशासकीय मान्यता देऊन शिक्षण विभागाकडे निधी वर्ग करण्यात आला आहे़ परंतु, शिक्षण विभागाच्या उदासीनतेमुळे आजपर्यंत सदर रक्कम विद्यार्र्थिनींच्या खात्यावर वर्ग झाली नसल्याने १०२० पात्र लाभार्थी विद्यार्थिनींना सायकलीची प्रतीक्षा करावी लागत आहे़ मानव विकास निर्देशांकानुसार जिल्ह्यातील ९ तालुक्यांची मानव विकास कार्यक्रम राबविण्यासाठी २०१३-१४ मध्ये निवड केली़ तेव्हापासून या तालुक्यात शिक्षण, आरोग्यासंदर्भात विविध योजना राबविण्यात येतात़ या योजनांवर शासन लाखो रूपये खर्च करते़ परंतु, प्रशासनातील काही अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे प्रत्यक्ष लाभ होण्यासाठी विलंब लागतो़ निवड झालेल्या तालुक्यातील शाळांकडून आठवी ते दहावीच्या गरजू विद्यार्र्थिनींचे सायकलीसाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते़ ज्या गावातून शाळेत जाण्यासाठी बसची व्यवस्था नाही, शाळेचे अंतर पाच ते सहा किलोमीटर आहे़ अशा गावातील विद्यार्थींनीचे प्रस्ताव मुख्याध्यापक, गटशिक्षण अधिकारी, शिक्षण विभागामार्फत जिल्हा नियोजन समितीकडे आले होते़ या प्रस्तावाची तपासणी करून जिल्हास्तरीय समितीने मागील वर्षात म्हणजेच २०१६-१७ मध्ये १ हजार २० सायकली मंजूर करण्यात आल्या़ यामध्ये लोहा तालुक्यासाठी १५१, बिलोली-३६, भोकर - १५५, देगलूर - २८१, धर्माबाद - १५०, किनवट - ९३, हिमायतनगर - १५, उमरी - १३६ तर किनवट तालुक्यातील तीन विद्यार्थिंनी सायकलीसाठी पात्र ठरल्या आहेत़ सदर सायकल खरेदीसाठी लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट २ हजार रूपये निधी वर्ग केला जातो आणि सायकल खरेदीनंतर १ हजार रूपये असे एकूण ३ हजार रूपये दिले जातात़ सायकल खरेदीसाठीच्या पहिल्या टप्प्यातील रक्कम ३० लाख ६० हजार रूपयांचा निधी जिल्हा नियोजन समितीने गट शिक्षण अधिकारी यांच्याकडे वर्ग केला़ हा निधी शिक्षण विभागामार्फत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर टाकला जातो़ परंतु, पात्र लाभार्थी मुलींचे बँक खाते नसल्याने अडचणी निर्माण झाल्या़ आजपर्यंत जवळपास ८०० विद्यार्थिनींनी खाते उघडले आहेत़ विद्यार्थिनीच्या खात्यावर निधी जमा झाला तर त्यांचे पालक सायकल खरेदी करू शकतील़ उर्वरित विद्यार्थ्यांचे खाते उघडण्याचे काम सुरू असल्याची शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले़ शैक्षणिक वर्ष जूनपासून सुरू होत असल्याने विद्यार्थिंनींना मे अथवा जूनच्या पहिल्या आठवड्यात सायकली मिळाल्या तर त्याचा योग्य लाभ होईल़