शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
4
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
5
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
7
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
8
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
9
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
10
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
11
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
12
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
13
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
14
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
15
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
16
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
17
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
18
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
19
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
20
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
Daily Top 2Weekly Top 5

बनकिन्होळा ग्रामपंचायत कार्यालयात भरली शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 00:08 IST

शालेय व्यवस्थापन समितीने शनिवारी (दि.१२) चक्क ग्रामपंचायत कार्यालयात शाळा भरवून आपला रोष व्यक्त केला.

लोकमत न्यूज नेटवर्कबनकिन्होळा : निल्लोड कें द्रांतर्गत येणाºया बनकिन्होळा येथील जि.प. शाळेच्या दुरुस्तीसाठी तब्बल दीड वर्षापासून निधी मंजूर आहे. मात्र, तरीही ग्रा.पं. प्रशासन शाळेच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ शालेय व्यवस्थापन समितीने शनिवारी (दि.१२) चक्क ग्रामपंचायत कार्यालयात शाळा भरवून आपला रोष व्यक्त केला. शाळेत विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका असून, वरिष्ठांनी दखल घेऊन त्वरित शाळा दुरुस्तीचे आदेश द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.येथील जि.प. शाळेत पहिली ते सातवीपर्यंत वर्ग आहेत. शाळेची इमारत जुनी झाल्याने इमारतीस अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. बºयाच ठिकाणी शाळेतील फरशी निखळल्या आहेत. तसेच पत्रे जीर्ण झाल्याने त्यांना छिद्रे पडली आहेत. यामुळे पावसाळ्यात पावसाचे पाणी वर्गात साचते. याच परिस्थितीत विद्यार्थ्यांना आपला जीव धोक्यात घालून ज्ञानार्जन करावे लागत आहे.विशेष म्हणजे शालेय व्यवस्थापन समिती व मुख्याध्यापकांनी इमारत दुरुस्तीसाठी दोन वर्षांपूर्वी जि.प. शिक्षण व बांधकाम विभागाकडे प्रस्ताव सादर केला होता.यानंतर जिल्हा परिषदेच्या वतीने या शाळेच्या दुुरुस्तीसाठी २ लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. यानंतर शालेय व्यवस्थापन समिती व मुख्याध्यापकांनी अनेक वेळा ग्रा.पं. कार्यालयाकडे शाळा दुरुस्तीची मागणी केली. मात्र, तरीही शाळेच्या इमारत दुरुस्तीकडे दुर्लक्षकरण्यात आले.शाळेची इमारत मोडकळीस आली असली तरी विद्यार्थी जीव धोक्यात घालून ज्ञानार्जन करीत असल्याची बाब निदर्शनास आली. त्यामुळे संतप्त झालेल्या पालकांसह शालेय व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाºयांनी विद्यार्थ्यांना सोबत घेऊन थेट ग्रामपंचायत कार्यालयात शाळा भरवून आपला रोष व्यक्त केला. तसेच त्वरित शाळेच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्याची मागणी करण्यात आली.यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष गणेश काकडे, सदस्य एकनाथ फरकाडे, गजानन जैस्वाल, सीताराम फरकाडे, सुभाष नवतुरे, राजू फरकाडे, लक्ष्मण शिंदे, तुकाराम फरकाडे, शब्बीर शहा, संजय फरकाडे, शाईनाथ दामले, ज्ञानेश्वर फरकाडे, विष्णू फरकाडे, संदीप फरकाडे, कारभारी फरकाडे, मुख्याध्यापक रामदास जाधव आदींसह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.