शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

‘सर्वोपचार’मध्ये औषधांचा तुटवडा

By admin | Updated: May 4, 2016 00:16 IST

सितम सोनवणे ल्ल लातूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात औषधांचा तुटवडा झाला आहे़ औषधांचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांचे देयके थकली आहेत़

रुग्णांची गैरसोय : पुरवठाधारक कंपन्यांचे २ कोटी ४४ लाख १४ हजारांची देयके थकलीसितम सोनवणे ल्ल लातूरशासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात औषधांचा तुटवडा झाला आहे़ औषधांचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांचे देयके थकली आहेत़ त्यामुळे पुरवठा बंद झाला असून, रुग्णांची गैरसोय होत आहे़ जवळपास २ कोटी ४४ लाख १६ हजार रुपयांची देयके थकली आहेत़ अत्यावश्यक सेवा म्हणून उपलब्ध करून दिलेल्या औषधीचीही देयके थकली आहेत़ त्यामुळे सर्वोपचार रुग्णालय जुजबी औषधोपचारावर रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत़ लातूर जिल्ह्यात सध्यस्थितीत दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे़ तसेच तीव्र प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली आहे़ अशा परिस्थितीत आजारी पडलेल्या सर्वसामान्य नागरिकांना उपचारासाठी आधार केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाणीटंचाई सोबतच औषधी टंचाईही निर्माण झाली आहे़ जिल्ह्यातील तसेच आंध्र व कर्नाटक सिमा भागातील रुग्ण मोठ्या प्रमाणात उपचारासाठी शासकीय रुग्णालय व सर्वोपचार रुग्णालयात दाखल होतात़ त्यामुळे सर्वोपचार रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागा अंतर्गत प्रतीदिन ८०० ते ९०० तपासणी केली जाते़ त्यातील किमान ५० ते १०० रुग्णांना गरजेनुसार उपचारासाठी दाखल करून घेतले जाते व त्यांच्यावर उपचार केले जातात़ पण मागील काही दिवसांपासून सर्वोपचार रुग्णालयात अपुरा औषध पुरवठा होत आहे़ अती गंभीर रुग्णांसाठी अतिदक्षता विभाग व सर्व वॉर्डसाठी महत्त्वाची असणारी सेंट्र ओटू सिस्टिम मागील २० दिवसांपासून बंद आहे़त्यामुळे रुग्णांना लागणाऱ्या १३ ते १४ इंजेक्शन व औषध गोळ्यांपैकी केवळ ६ ते ७ प्रकारचे औषधोपचार मिळत आहेत़ अन्य औषध गोळ्या गरजेनुसार रुग्णांना बाहेरून विकत आणून उपचार घ्यावे लागत आहेत़ अशा टंचाईग्रस्त परिस्थितीत या सर्वसामान्य नागरिकांची मात्र ससेहोलपट होत आहे़ सेंट्रल ओटू सिस्टिम मागील २० दिवसांपासून बंद आहे़ त्यामुळे प्रशासनाने जम्बो सिलेंडरचा वापर करून रुग्णांची तात्पुरती सोय केली आहे़ २० दिवसांत सुमारे ४०० सिलेंडर लागले असून, १ सिलेंडर ३१५ रुपयांना उपलब्ध होते़ सिलेंडरच्या माध्यमातून रुग्णांना आॅक्सिजन पुरविताना पुर्ण यंत्रणा कर्मचारी यांना सतर्क रहावे लागते़ सेंट्रल ओटू सिस्टिम मुळे अतिदक्षता विभाग तसेच वार्डामध्ये गंभीर झालेल्या रुग्णांना सहजपणे उपचार देता येतात़ जम्बो सिलेंडर वापरताना तात्काळ योग्य पद्धतीने वापर न झाल्यास रुग्णाला आपले प्राणही गमवावे लागतात़ यंत्रणा असूनही केवळ २ लाख १९ हजार रुपयांचे देयके थकल्यामुळे कंपनीने आॅक्सिजन पुरवठा बंद केले आहे़ तर औषध गोळ्यांचे २ कोटी ४४ लाख १६ हजार रुपयांची देयके थकल्यामुळे मागणी करूनही कंपन्यांकडून औषध पुरवठा होत नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे़रुग्णालयात केवळ ६ प्रकारची औषधी उपलब्ध़़़सर्वोपचार रुग्णालयात १३ ते १४ प्रकारची औषधी व इंजेक्शन रुग्णांना आजारानुसार मिळतात़ परंतू सध्या रुग्णालयात केवळ ६ ते ७ प्रकारच्या औषधांचा पुरवठा आहे़ अन्य औषधांची गरज लागली तरी ते रुग्णालयाकडून मिळत नाहीत़ खाजगी औषधी दुकानातून रुग्णांना आणावी लागत आहेत़ यामुळे रुग्ण व नातेवाईकांची गैरसोय होत आहे़ केवळ औषधी कंपन्यांची देयके थकल्यामुळे ही परिस्थिती रुग्णालय प्रशासनावर ओढावली आहे़ दरम्यान रुग्णालयाकडूनही निधी मिळाला नसल्याचे कारण सांगितले जात आहे़निधी मिळाला नाही़़़सर्वोपचार रुग्णालयाचे मागील वर्षाचे बजेट मंजूर झाले होते़ पण शासनाकडून ते दिले गेले नव्हते़ यावर्षीच्या बजेट मंजूर झाले आहे़ पण महाविद्यालयाकडे ते हस्तांतरीत केले नाही़ बजेट आल्यानंतर देयके तत्काळ काढले जातील असे शासकीय सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ़अशोक शिंदे यांनी सांगितले़