शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

शस्त्राच्या धाकाने लुबाडणूक

By admin | Updated: June 30, 2017 03:42 IST

मुंबई-पुणे महामार्गावर देहूरोड येथील स्वागत कमानीजवळ नादुरुस्त झाल्याने दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या मालमोटार चालकाला

लोकमत न्यूज नेटवर्कदेहूरोड : मुंबई-पुणे महामार्गावर देहूरोड येथील स्वागत कमानीजवळ नादुरुस्त झाल्याने दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या मालमोटार चालकाला दोन दुचाकीवरून आलेल्या सहा इसमांनी तलवार व कोयत्याचा धाक दाखवून मारहाण करीत रोकड व मोबाईल असा बारा हजार सातशे रुपयांचा ऐवज जबरदस्तीने पळवून नेला. मंगळवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास हा प्र्रकार घडला. एका अल्पवयीन आरोपीसह चौघांना देहूरोड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.राजू दशरथ काटे (वय ४५, रा. नांदगाव, शिवाजी चौक, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) असे जखमी चालकाचे नाव आहे. येथील संत तुकाराममहाराज स्वागत कमानीजवळ नादुरुस्त मालमोटार (एमएच २५ यू १११०) रस्त्याच्या कडेला उभी केली होती. दुरुस्तीसाठी मेकॅनिकच्या प्रतीक्षेत थांबलेल्या चालकाला दोन दुचाकीवरून आलेल्या सहा अज्ञातांनी तलवार आणि कोयत्याचा धाक दाखवला. चालकाच्या हातावर वार करून चालक व त्याचा सहकारी अशा दोघांकडील मोबाईल व ७५०० रुपये घेऊन ते देहूगावच्या दिशेने पसार झाले. माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.