शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणकडून सव्वाशे नोटिसा

By admin | Updated: June 23, 2016 01:36 IST

औरंगाबाद : महावितरणने शहरात सध्या कायमस्वरुपी वीज बंद केलेल्या ग्राहकांची तपासणी मोहीम उघडली आहे. यामध्ये आतापर्यंत

औरंगाबाद : महावितरणने शहरात सध्या कायमस्वरुपी वीज बंद केलेल्या ग्राहकांची तपासणी मोहीम उघडली आहे. यामध्ये आतापर्यंत ११५ जणांनी बेकायदेशीररीत्या दुसरे मीटर घेतल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या सर्वांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. महावितरणच्या नियमानुसार वीज देयक न भरणाऱ्या तसेच प्रत्यक्ष वीजचोरी करणाऱ्या ग्राहकांवर दंडात्मक कारवाई करून कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केला जातो. संबंधित ग्राहकांचे मीटरही काढून घेण्यात येते. या ग्राहकांना नव्याने कनेक्शन देणे हा गुन्हा आहे. तरीही शहरात अशा किती तरी ग्राहकांना नवीन मीटर दिले गेले आहे.महावितरण कंपनीने सध्या कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांची तपासणी मोहीम हाती घेतली आहे. पंधरा दिवसांपासून महावितरणचे पथक अशा ग्राहकांच्या घरी जाऊन तपासणी करीत आहेत. आतापर्यंत सुमारे ११५ जणांना नियमाविरुद्ध मीटर दिले गेल्याचे आढळून आले आहे. यातील काही जणांनी त्याच नावाने तर काही जणांनी दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने मीटर घेतले आहे. ही बाब आढळल्यामुळे महावितरण कंपनीने या सर्वांना नोटिसा बजावल्या आहेत. शहरात कायमस्वरुपी वीज कनेक्शन कापलेल्या ग्राहकांची संख्या ही सुमारे ३० हजार इतकी आहे. महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी सांगितले की, पंधरा दिवसांपासून शहरात पीडी (कायमस्वरुपी वीज कापलेल्या) ग्राहकांची तपासणी सुरू आहे. पीडी ग्राहकांची संख्या मोठी आहे.सध्याच्या काळात विजेशिवाय राहणे कुणालाही शक्य नाही. त्यामुळे हे लोक कुठून तरी वीज वापरत असणार हे नक्की आहे. म्हणूनच ते कुठून वीज वापरताहेत, त्यांना नवीन मीटर दिले गेले आहे का, दिले असेल तर ते कुणी दिले याची माहिती घेतली जात आहे. आतापर्यंत शहरात ११५ जणांनी दुसरे मीटर घेतल्याचे आढळून आले आहे. सध्या त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.