शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

‘कारभारी’ नसल्याने वर्षभरात दहा कोटींची बचत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:27 IST

औरंगाबाद : मागील नऊ महिन्यांपासून नागरिकांनी महापालिकेत पाठविलेले लोकप्रतिनिधी नाहीत. आणखी काही महिने ते येण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे ...

औरंगाबाद : मागील नऊ महिन्यांपासून नागरिकांनी महापालिकेत पाठविलेले लोकप्रतिनिधी नाहीत. आणखी काही महिने ते येण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे प्रशासनाची जवळपास १० कोटी रुपयांची बचत झाली. नगरसेवकांचे मानधन, पदाधिकाऱ्यांचा वाहन भत्ता खर्च, स्वेच्छा निधी, दाैरे हा खर्च वाचला. याशिवाय नगरसेवकांनी सुचविलेल्या अनावश्यक विकास कामांचा खर्च गृहीत धरला, तर तो किमान ६० ते ७० कोटीपर्यंत जाईल.

लोकशाही प्रक्रियेत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांनी पाठविलेले हक्काचे प्रतिनिधी आवश्यक असतात. एप्रिल २०२० मध्ये औरंगाबाद महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार होत्या; परंतु कोरोना संसर्गामुळे निवडणुका पुढे ढकलाव्या लागल्या. त्यानंतर निवडणुकीशी संबंधित वार्ड आरक्षणाचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला. न्यायालयाने परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश दिले. आता सर्वोच्च न्यायालयात निवाडा झाल्याशिवाय निवडणुका घेणे अशक्यप्राय आहे. आगामी एप्रिल महिन्यापर्यंत निवडणुका होतील किंवा नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. मागील वर्षभरात महापालिकेत लोकप्रतिनिधी नसल्यामुळे प्रशासनाचा किती खर्च वाचला याचा प्राथमिक अंदाज घेतला असता आतापर्यंत १० कोटी रूपये वाचले आहेत. दर महिन्याला प्रत्येक नगरसेवकाला ७ हजार रुपये मानधन देण्यात येते. स्थायी समिती, सर्वसाधारण सभेची बैठक असल्यास १०० रुपये स्वतंत्र भत्ता देण्यात येतो. प्रत्येक नगरसेवकाला (स्वीकृत नगरसेवक) २ लाख रुपये स्वेच्छा निधी देण्यात येतो. हा निधी एक वर्षात संबंधित नगरसेवकाला आपल्या वार्डात विकास कामांवर खर्च करावा लागतो. याशिवाय महापालिकेत काम पाहणारे पाच पदाधिकारी असतात. प्रत्येक पदाधिकाऱ्यांना वाहन भत्ता म्हणून दरमहा २२ हजार रुपये देण्यात येतात. वेगवेगळ्या विषय समित्यांचे पाच सभापती असतात. त्यांना वाहनभत्ता, चहापाणी खर्च म्हणून १२ हजार रुपये देण्यात येतात. सर्वसाधारण सभेच्या एक दिवसाच्या बैठकीचा खर्च जवळपास एक लाखाहून अधिक होतो. पदाधिकारी अधून मधून दिल्ली-मुंबई येथे दौरे काढतात. विदेशातील प्रकल्प पाहण्यासाठी दौऱ्याचे आयोजन करण्यात येते. याला अभ्यास दौरा असे गोंडस नाव दिल्या जाते. प्रत्येक पदाधिकाऱ्याच्या दालनात दोन शिपाई, एक लिपिक प्रशासनाकडून देण्यात येतो. त्यांच्या पगाराचा खर्च दर महिना किमान ६० हजार रुपये होतो. महापौर दालनात किमान दहा कर्मचारी नेमलेले असतात. त्यांच्या पगाराचा खर्च दरमहा किमान तीन लाख रुपये होतो. महापौर बंगल्यात चहा पाण्यासाठी दर महिन्याला दहा हजार रुपयांची तरतूद केलेली असते.

असा होतो दरवर्षी खर्च

स्वेच्छा निधी- २ कोटी ५० लाख

नगरसेवक मानधन- १ कोटी ८ लाख

पदाधिकारी वाहन भत्ता - १ कोटी ६० लाख

कर्मचारी पगार - १ कोटी ४० लाख