शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

सत्यशोधक विवाह चळवळ गतिमान व्हावी : प्रतिमा परदेशी

By admin | Updated: February 5, 2017 23:18 IST

लातूर :भालचंद्र रक्तपेढीच्या सभागृहात रविवारी तिसरे राज्यस्तरीय सत्यशोधिका मुक्ता साळवे साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले.

लातूर : सत्यशोधक सहजीवन, सत्यशोधक विवाह, सत्यशोधक घरभरणी, सत्यशोधक राष्ट्रवाद याचा स्वीकार करणे हा मुक्ता साळवेंचा विचार प्रसारित होणे गरजेचे आहे. ब्राह्मणशाही फक्त पोथी-पुराणात, धार्मिक कर्मकांडातूनच व्यक्त होत नाही, तर जीवनाच्या सर्व क्षेत्रात ती शोषिकाची भूमिका वठविते, हे वास्तव मुक्ता साळवे यांनी आपल्या निबंधातून अधोरेखित केले असल्याचे मत मुक्ता साळवे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा प्रा. प्रतिमा परदेशी यांनी येथे व्यक्त केले.भालचंद्र रक्तपेढीच्या सभागृहात रविवारी तिसरे राज्यस्तरीय सत्यशोधिका मुक्ता साळवे साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी त्या बोलत होत्या. मंचावर उद्घाटक ज्येष्ठ विचारवंत डॉ. जनार्दन वाघमारे, स्वागताध्यक्ष प्रा.डॉ. रमेश पारवे, संयोजक प्राचार्य डॉ. माधव गादेकर, रमेश राक्षे, बी.पी. सूर्यवंशी, दशरथ सरवदे यांची उपस्थिती होती.प्रा. परदेशी पुढे म्हणाल्या, मुक्ता साळवेंचा विचार प्रसारित करताना सत्य धर्माच्या प्रचार-प्रसारासोबत सत्यशोधक विवाहाची चळवळही गतिमान केली पाहिजे. ब्राह्मणी धर्माच्या शोषणाला, वर्चस्ववादाला रोखण्यासाठी सत्यशोधक सहजीवन, सत्यशोधक विवाह, सत्यशोधक घरभरणी, सत्यशोधक राष्ट्रवाद याचा विचार स्वीकारणे काळाची गरज आहे. मनुस्मृतीने कनिष्ठ जातींना ज्ञानाचा अधिकार नाकारला होता. जर कोणी ज्ञानार्जनाचा प्रयत्न केलाच, तर त्याचे मुंडके धडावेगळे केले जाई. वेद ऐकले तर तप्त शिस्याचा रस कानात ओतणे, पाहिले तर डोळे काढणे, वाचले तर जीभ हसाडणे यासारख्या शिक्षा मनुस्मृती देते. ज्ञानावरील ब्राह्मणी वर्चस्वाला आव्हान उभे राहू नये, यासाठी धर्मग्रंथ रचले गेले आणि दंडकही घालण्यात आले होते. मुक्ता साळवे याच इतिहासाची आठवण करून देते, असेही त्या म्हणाल्या. सूत्रसंचालन दयानंद कांबळे यांनी केले. अशोक तोगरे यांनी आभार मानले. संमेलनाला अभ्यासकांची मोठ्या संख्येने उपस्थिती आहे. (आणखी वृत्त हॅलो / २ वर)