शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

सातारा न.प.चे कामकाज सुरू

By admin | Updated: September 7, 2014 00:42 IST

औरंगाबाद : आठवडाभराच्या प्रतीक्षेनंतर अखेर आजपासून सातारा-देवळाई नगर परिषदेचे कामकाज सुरू झाले.

औरंगाबाद : आठवडाभराच्या प्रतीक्षेनंतर अखेर आजपासून सातारा-देवळाई नगर परिषदेचे कामकाज सुरू झाले. अधिसूचनेची प्रत प्राप्त झाल्यानंतर तहसीलदार तथा प्रशासक विजय राऊत यांनी आज ग्रामसेवकांकडून पदभार स्वीकारला. याबरोबरच सातारा आणि देवळाई या दोन्ही ग्रामपंचायती बरखास्त झाल्या आहेत. सातारा आणि देवळाई गावांची झपाट्याने होणारी वाढ लक्षात घेऊन राज्य सरकारने येथे नगर परिषद स्थापन केली आहे. नगरविकास विभागाने दोन्ही गावांसाठी एक संयुक्त नगर परिषद स्थापन केल्याची अधिसूचना २८ आॅगस्ट रोजीच जारी केली. मात्र, गेली आठ दिवस जिल्हा प्रशासनाला अधिसूचनेची अधिकृत प्रत प्राप्त झाली नव्हती. राज्य सरकारने नवीन नगर परिषदेवर प्रशासक म्हणून औरंगाबाद येथील तहसीलदारांची नियुक्ती केली आहे. हा आदेशही अधिसूचनेतच नमूद होता; पण अधिसूचनेची प्रत नसल्यामुळे प्रशासकांनी पदभार स्वीकारला नव्हता. शुक्रवारी अधिसूचनेची प्रत प्राप्त झाल्यानंतर तहसीलदार विजय राऊत यांनी आज नगर परिषदेचे प्रशासक म्हणून पदभार घेतला. दुपारी १ वाजता त्यांनी सातारा ग्रामपंचायतीच्या कार्यालयात जाऊन ग्रामसेवक बी. टी. साळवे यांच्याकडून सूत्रे स्वीकारली. त्यानंतर देवळाई ग्रामपंचायत कार्यालयात जाऊनही त्यांनी तेथील ग्रामसेवक धनेधर यांच्याकडून पदभार घेतला. दोन्ही ग्रामसेवकांकडून ग्रामपंचायतींची कागदपत्रे आणि दप्तर ताब्यात घेण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते.जमाखर्चाचा हिशोब सुरूसातारा आणि देवळाई येथील ग्रामपंचायती बरखास्त होऊन तिथे आजपासून नगर परिषद अस्तित्वात आली. त्यामुळे दोन्ही ठिकाणच्या ग्रामसेवकांकडून दप्तर प्रशासकांच्या ताब्यात देण्याचे काम सायंकाळपर्यंत सुरू होते. यात ग्रामसेवकांकडून मालमत्तांची माहिती, जमाखर्चाचा हिशोब, कर्मचाऱ्यांचे रेकॉर्ड तसेच जमिनीच्या नोंदी आदींचा समावेश आहे. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत नवीन नगर परिषदेकडे किती जमा रक्कम आहे, याचा हिशोब मिळाला नसल्याचे प्रशासक विजय राऊत यांनी सांगितले.