शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी ७0 अर्जांची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2016 11:39 IST

नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीत नामनिर्देनपत्र विक्री करण्याच्या पाचव्या दिवसअखेर ७0 नामनिर्देशन पत्राची विक्री झाली

नांदेड : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीत नामनिर्देनपत्र विक्री करण्याच्या पाचव्या दिवसअखेर ७0 नामनिर्देशन पत्राची विक्री झाली आहे. तर सर्वसाधारण सहकारी संस्था मतदारसंघातून आजपर्यंत एका उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पाच दिवसांत ७0 नामनिर्देशनपत्राची विक्री झाल्याने बाजार समितीची निवडणूक दुष्काळामध्ये रंगण्याची शक्यता वाटत आहे. वेळोवेळी या-ना त्या कारणाने लांबणीवर पडलेल्या बाजार समितीच्या निवडणुकीला अखेर मुहूर्त लागला आहे. या निवडणुकीत काँग्रेसविरुद्ध महाआघाडी होणार की काँग्रेसचा मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी हातमिळवणी करणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही. त्यामुळे इच्छुकांची संख्या मोठी असली तरी ऐनवेळी कोणाचा पत्ता कट होणार आणि कोणाला संधी मिळणार हे सांगणेही कठीण आहे. त्यामुळे इच्छुकांची संख्या जास्त झाल्यास काही पक्षातील कार्यकर्ते बंड करुन अपक्ष निवडणूक रिंगणात उभे राहण्याची शक्यता आहे. उमेदवारी कोणाला द्यायची यासंदर्भात अद्याप कोणत्याही पक्षाकडून निर्णय झाला नाही. त्यामुळे कार्यकर्तेही संभ्रमावस्थेत आहेत. परंतु जिल्हा मध्यवर्ती बँक, मजुर फेडरेशन व भाऊराव सहकारी साखर कारखाना निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध महाआघाडी निवडणुक रिंगणात उतरली होती. त्याचवेळी आता लोहा आणि नायगाव या दोन बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रमही घोषीत झाला आहे.