जालना : महिलांच्या कलागुणांना वाव देणारा ‘सखी महोत्सव’ हा कार्यक्रम काही अपरिहार्य कारणास्तव २० ऐवजी २५ मार्च रोजी जुना जालन्यातील खेरुडकर मंगल कार्यालयात सकाळी ११ वाजता होणार आहे. यापूर्वी हा कार्यक्रम मातोश्री लॉन येथे होणार असल्याचे जाहीर केले असल्याची माहिती संयोजकांनी दिली.या महोत्सवामध्ये समूह रांगोळी, ब्रायडल (नवरी) मेकअप, मेहंदी, पाक कृती, फॅन्सी ड्रेस (प्रांतिक वेशभूषा )आदी स्पर्धा घेण्यात येणार आहेत. यापूर्वी ज्या सखींनी विविध स्पर्धेसाठी नावनोंदणी केली आहे, त्यांनी बदलेली तारीख व बदलेल्या स्थळाची नोंद घ्यावी, ज्या सखींनी अद्याप नोंदणी केली नाही. त्यांनी ९९२२००४४०७ किंवा ९५५२५६४५६० या मोबाईल क्रमांकावर नावे नोंदवून स्पर्धेचा आनंद घ्यावा. कोणत्याही एका प्रकारात सखींना नाव नोंदणी करता येईल. परिक्षकांचा निर्णय अंतिम राहणार असून प्रत्येक स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे तर देण्यात येतीलच शिवाय प्रत्येकींना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे. २९ मार्च रोजी सखींसाठी खास बहारदार लावण्याचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
सखी महोत्सव आता २५ मार्चला
By admin | Updated: March 18, 2015 00:17 IST