शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

खराब वातावरणातही धावपट्टी दिसेल स्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2016 00:44 IST

औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ धावपट्टीवरील अ‍ॅप्रोच लाईट यंत्रणा ४६० वरून ९०० मीटर करण्यासाठी प्राधिकरणाने प्रस्ताव सादर केला आहे.

औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ धावपट्टीवरील अ‍ॅप्रोच लाईट यंत्रणा ४६० वरून ९०० मीटर करण्यासाठी प्राधिकरणाने प्रस्ताव सादर केला आहे. ही यंत्रणा ९०० मीटरपर्यंत वाढविल्याने खराब वातावरणातही धावपट्टी स्पष्टपणे दिसण्याची क्षमता वाढणार आहे. त्यामुळे विमानांची लँडिंग अधिक सुरक्षित होण्यास मदत होणार आहे.विमानतळावरील धावपट्टी रात्रीच्या वेळी सहजरीत्या दिसण्यासाठी विशेष पॅटर्न असलेली अप्रोच लाईटची यंत्रणा असते. या यंत्रणेच्या मदतीने रात्रीच्या वेळी लँड होणाऱ्या विमानांना मदत होत असते. चिकलठाणा विमानतळावरील धावपट्टी (रनवे-२७) वरील सध्या अ‍ॅप्रोच लाईटची यंत्रणा ४६० मीटर आहे. आजघडीला काही अडचणी येत नसल्या तरीही ही यंत्रणा ९०० मीटर पाहिजे. त्यामुळे त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय विमानतळ प्राधिकरणाने घेतला आहे. ४६० वरून थेट ९०० मीटरपर्यंत वाढविण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे. ही यंत्रणा अशाप्रकारे वाढविताना सुखना नदीचा काही भाग यामध्ये येतो. त्यामुळे या ठिकाणी पिलर उभे करून त्यावर लाईट लावण्यासाठी मंजुरी मागण्यात आली आहे. ही यंत्रणा विमानतळासाठी आणि विमानांच्या उड्डाणासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे याबाबत विमानतळ प्राधिकरण प्राधान्याने प्रयत्न करीत आहे. अ‍ॅप्रोच लाईट यंत्रणा महत्त्वाची असल्याने ती वाढविण्यासाठी प्रयत्न केला जात असल्याचे विमानतळाचे निदेशक आलोक वार्ष्णेय यांनी सांगितले.