शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांकडूनच नियम धाब्यावर !

By admin | Updated: January 17, 2017 23:11 IST

जालना शासकीय अधिकारी, कर्मचारी म्हटलं की, तो नियमांवर बोट ठेवून इतरांना त्याचे पालन करण्यासाठी ‘मार्गदर्शन’ करतो हे सर्वश्रुत आहे

हरी मोकाशे  जालनाशासकीय अधिकारी, कर्मचारी म्हटलं की, तो नियमांवर बोट ठेवून इतरांना त्याचे पालन करण्यासाठी ‘मार्गदर्शन’ करतो हे सर्वश्रुत आहे. परंतु, काही सरकारी अधिकारी व कर्मचारी नियम अलगदपणे बाजूला ठेवून गाडी वेगवान कशी हाकतात हे याचे वास्तव शहरात पहावयास मिळते. सध्या उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने वाहतूक सुरक्षा मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा अन्य विभागाचे अधिकारीच कसा फज्जा उडवित आहेत, हे शासकीय वाहनांकडे पाहिल्यास दिसून येत आहे.रस्ता अपघाताचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी राज्यात सध्या वाहतूक सुरक्षा मोहीमेचा गाजावाजा सुरू आहे. यात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासह वाहतूक शाखा व अन्य विभागांचे अधिकारी सहभागी आहेत. शाळा- महाविद्यालयांत सुरक्षित वाहतुकीची माहिती दिली जात आहे. त्यामुळे एकीकडे प्रबोधन होत असले तरी दुसरीकडे किमान नियमाप्रमाणे व स्वत:च्या सुरक्षेसाठी आपली वाहने सज्ज ठेवण्यास दुर्लक्ष करीत असल्याचे मंगळवारी आढळून आले.जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा परिषद, तहसील, पंचायत समिती, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाहतूक शाखा आदी शासकीय कार्यालये आहेत. या कार्यालयांतील अधिकाऱ्यांसाठी शासकीय वाहने आहेत. या वाहनांच्या दुरुस्तीचा खर्चही शासनाच्या तिजोरीतून केला जातो. पण या वाहनास आवश्यक ते साहित्य बसविण्यास अधिकारीच कानाडोळा करीत असल्याचे दिसून येत आहे. चारचाकी वाहनाच्या उजव्या व डाव्या बाजूचा आरसा म्हणजे वाहनचालकाचा तिसरा डोळा समजला जातो. परंतु, शहरातील बहुतांशी शासकीय वाहनांना हा ‘तिसरा डोळा’च नाही. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाची रुग्णवाहिका, जिल्हाधिकारी कार्यालयातील काही वाहने, पोलीस अधिकाऱ्यांच्या वाहनांस डाव्या बाजूचे आरसेच नाहीत. विशेष म्हणजे, आरोग्य विभागाच्या रुग्णवाहिकेस दोन्ही बाजूचे आरसेच नसल्याचे आढळून आले. वास्तविक पहाता, डाव्या बाजूच्या आरश्यामुळे डाव्या बाजूने पाठीमागून येणारे वाहन दिसते. तसेच वाहन पाठीमागे घेताना डाव्या बाजूने अपघात होण्याची जास्त भीती असते. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने करण्यात येणाऱ्या तपासणीवेळी यावर सर्वाधिक भर देण्यात येतो.