शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शेतीपंपांची थकबाकी ९ हजार कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 00:45 IST

महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत औरंगाबाद, जळगाव, नांदेड व लातूर परिमंडळातील ११ जिल्ह्यांचा समावेश असून, या जिल्ह्यांमध्ये शेतीपंपांच्या वीज ग्राहकांकडे तब्बल ९ हजार ७३७ कोटी रुपयांची थकबाकी आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत औरंगाबाद, जळगाव, नांदेड व लातूर परिमंडळातील ११ जिल्ह्यांचा समावेश असून, या जिल्ह्यांमध्ये शेतीपंपांच्या वीज ग्राहकांकडे तब्बल ९ हजार ७३७ कोटी रुपयांची थकबाकी आहे.महावितरण औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत मंडळ कार्यालयांमधील शेतीपंप वीज ग्राहकांकडे असलेली थकबाकी पुढीलप्रमाणे आहे. यामध्ये औरंगाबाद शहर मंडळांतर्गत २ हजार ४२ वीज ग्राहकांकडे १५ कोटी ८२ लाख रुपये, औरंगाबाद ग्रामीण मंडळांतर्गत २ हजार १२ हजार ४७४ वीज ग्राहकांकडे १ हजार ३४८ कोटी ५३ लाख रुपये, जालना मंडळांतर्गत १ लाख १९ हजार ९४० ग्राहकांकडे ९५० कोटी ४६ लाख रुपये, जळगाव मंडळांतर्गत १ लाख ९२ हजार ८२३ ग्राहकांकडे १ हजार ५६८ कोटी २८ लाख रुपये, नंदुरबार मंडळांतर्गत ४७ हजार ६०७ वीज ग्राहकांकडे ३६० कोटी ६५ लाख रुपये, धुळे मंडळांतर्गत ८८ हजार ८२८ ग्राहकांकडे ६०५ कोटी ८६ लाख रुपये, नांदेड मंडळांतर्गत १ लाख २२ हजार ३८४ ग्राहकांकडे ८७९ कोटी ३९ लाख रुपये, परभणीमध्ये ९२ हजार ६४८ वीज ग्राहकांकडे ७३८ कोटी ४२ लाख रुपये, हिंगोलीमध्ये ७० हजार ६६० ग्राहकांकडे ५०३ कोटी ८३ लाख रुपये, लातूर मंडळांतर्गत १ लाख २१ हजार ७१० ग्राहकांकडे ७३१ कोटी ४३ लाख रुपये, बीड मंडळांतर्गत १ लाख ६७ हजार ३३४ ग्राहकांकडे १ हजार १२६ कोटी ५६ लाख रुपये, उस्मानाबाद मंडळांतर्गत १ लाख ४४ हजार ३६३ ग्राहकांकडे ९०७ कोटी ८२ लाख रुपये, असे एकूण १३ लाख ८२ हजार ८१३ शेतीपंपांच्या वीज ग्राहकांकडे ९ हजार ७३७ कोटी ५ लाख रुपयांची थकबाकी आहे. शेती पंपाच्या ग्राहकांनी लवकरात लवकर थकबाकी महावितरण कंपनीकडे भरावी, असे आवाहन प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया यांनी केले आहे.