शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

रोहित्र दुरुस्ती रखडली

By admin | Updated: April 25, 2016 00:42 IST

बीड : बीड विभागाच्या ग्रामीण भागातील रोहित्रांची दुरूस्ती रखडलेली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे रोहित्रांची दुरुस्ती,

बीड : बीड विभागाच्या ग्रामीण भागातील रोहित्रांची दुरूस्ती रखडलेली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे रोहित्रांची दुरुस्ती, तर लांबच बिघडलेल्या अवस्थेत रोहित्र जागेवरच पडून आहेत. अशा रोहित्रांची संख्या ५०० पेक्षा अधिक असूनदेखील याबाबत अतिरिक्त कार्यकारी अभियंता इटकर अनभिज्ञ आहेत. रोहित्रांची दुरूस्ती रखडल्याने पंखे, कूलर बंद आहेत. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांना घामाघूम व्हावे लागत आहे.रोहित्रांसाठी आवश्यक असलेले आॅईल उपलब्ध नसल्याचे कारण अधिकारी सातत्याने पुढे करीत आहे. विभागात बीड ग्रामीणसह गेवराई, आष्टी, शिरूर, पाटोदा या तालुक्यांचा समावेश होतो. प्रत्येक तालुक्यात १०० पेक्षा अधिक रोहित्रांमध्ये बिघाड झाला आहे. दुरूस्तीकरिता याचा वाहतूकीचा खर्च कुणी करायचा, असा सवाल उपस्थित झाल्याने रोहित्र जागेवरच पडून आहेत. यामध्ये १००, ६३, २५, १५ के.व्हींचा समावेश आहे. रोहित्रांच्या दुरूस्तीची कामे रखडल्याने दरवर्षीच्या हंगामात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. त्या अनुषंगाने सध्याच्या कालावधीत रोहित्र दुरूस्तीची मोहीम हात घेणे आवश्यक असतानाही अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने आर्थिंगला पाणी पुरवठा होणेदेखील मुश्किल झाले आहे. यातच स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या अभियंता, लाईनमन यांना विभागातील अधिकाऱ्यांकडून सहकार्य होत नसल्यानेच जिल्हा भारनियमनमुक्त असतानाही विजेचा लपंडाव कायम आहे.विभागात किती नादुरूस्त रोहित्रे आहेत, त्यांच्या दुरूस्तीकरिता कोणत्या साहित्याचा पुरवठा होणे गरजेचे आहे, अशा प्रकारची माहिती अधिकाऱ्यांनाच नसल्याने दुरूस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. मुख्य कार्यालयाकडून रोहित्रांची पूर्तता झाली तरी नियम डावलून अधिकची रक्कम अदा करेल त्यालाच रोहित्र दिले जाते. यावर ना अधीक्षक अभियंत्याचा धाक राहिला आहे ना मुख्य अभियंत्याचा.मनमानी कारभारजास्तीची रक्कम भरणाऱ्या ग्राहकांनाच रोहित्र पुरविले जात आहे. याविषयी अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांच्या विरोधात ढेकणमोहा येथील ग्रामस्थांनी तक्रार नोंद केली होती. अधीक्षक अभियंत्यांनीही समज देऊनही तेच प्रकार सुरु असल्याने ग्राहक त्रस्त आहेत. (प्रतिनिधी)आॅनलाईनद्वारे बीड विभागाकडे सुमारे ६३ हजार लिटर आॅईल असल्याचे दाखविले जात आहे. प्रत्यक्षात एक थेंबही उपलब्ध नाही. आनॅलाईनद्वारे साहित्याचा पुरवठा व शिल्लक साठा वरिष्ठ कार्यालयाला कळविणे गरजेचे आहे. असे असताना आॅनलाईन प्रणालीकडे विभागातील अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.रोहित्रांच्या दुरूस्तीकरिता प्रामुख्याने किटकॅट, केबल, लगझर यांचा तुटवडा कायम आहे; याशिवाय गाव स्तरावरील रोहित्रांवर अधिकचा ताण पडत आहे. रोहित्र फेल झाले तरी ते उतरविण्यास साहित्याअभावी दोराचा आधार घ्यावा लागत आहे.