शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

इंटरनेट कॅफेवर उमेदवारांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 00:14 IST

मनपा निवडणूक प्रक्रियेत उमेदवारांना आॅनलाईन अर्ज भरावे लागणार आहेत. शनिवारी पहिल्या दिवशी अनेक इच्छुक उमेदवारांनी इंटरनेट कॅफेकडे धाव घेतली. इंटरनेट कॅफेधारकांनी या संधीचा लाभ उठवत अव्वाच्या सव्वा रक्कम इच्छुकांकडून उकळली.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : मनपा निवडणूक प्रक्रियेत उमेदवारांना आॅनलाईन अर्ज भरावे लागणार आहेत. शनिवारी पहिल्या दिवशी अनेक इच्छुक उमेदवारांनी इंटरनेट कॅफेकडे धाव घेतली. इंटरनेट कॅफेधारकांनी या संधीचा लाभ उठवत अव्वाच्या सव्वा रक्कम इच्छुकांकडून उकळली.अर्ज भरण्यासाठी ठरावीक रक्कम आकारण्याबाबत कोणत्याही सूचना महापालिकेने इंटरनेट कॅफेधारकांना, सेतू सुविधा चालकांना दिल्या नाहीत. त्याचाच लाभ उठवत उमेदवारांची लूट चालवली जात आहे. सध्या पितृपक्ष असल्यामुळे बहुतांश उमेदवार हे २० सप्टेंबरनंतरच उमेदवारी दाखल करतील, अशी चिन्हे आहेत. त्यामुळे शेवटच्या तीन दिवसांच्या कालावधीत अर्ज भरण्यासाठी नेट कॅफेवर गर्दीच होणार आहे.त्या कालावधीतही लुटीची मोठी संधी मिळणार आहे. याबाबत प्रभाग क्र. १५ मधील दिनेश शेषराव बोडके, लक्ष्मी वामनराव टोम्पे या दोन इच्छुक उमेदवारांनी महापालिकेच्या मुख्य इमारतीत असलेल्या एका नेटकॅफेवर अर्ज भरण्यासाठी त्यांना पाच हजार रुपये भाव असल्याचे सांगितले. या दोन्ही उमेदवारांनी मनपा निवडणूक विभागाकडे तक्रार केली आहे.या तक्रारीची दखल घेऊन तरी आॅनलाईन उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ठरावीक रक्कम आकारण्याच्या सूचना देईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.