शहरं
Join us  
Trending Stories
1
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
2
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
3
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
4
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
5
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
6
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
9
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
10
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
11
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
12
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
13
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
15
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
20
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार

मारहाण करून भाविकांना लुटले

By admin | Updated: June 15, 2014 00:54 IST

औरंगाबाद : ७-८ भाविकांना ८ जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण करीत ८ हजार रुपये लुटल्याची घटना शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास बाबा पेट्रोल पंप चौकातील शहर बसथांब्याजवळ घडली.

औरंगाबाद : तुळजापूर येथे देवीच्या दर्शनाला जाण्यासाठी जीपची वाट बघत थांबलेल्या ७-८ भाविकांना ८ जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण करीत ८ हजार रुपये लुटल्याची घटना शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास बाबा पेट्रोल पंप चौकातील शहर बसथांब्याजवळ घडली. यासंदर्भात पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, वाळूज औद्योगिक परिसरातील रांजणगाव येथील रहिवासी गोरख भीमाशंकर वेताळ (२४) व त्याचे अन्य ६ साथीदार रात्री तुळजापूर येथे देवीच्या दर्शनाला जाण्यासाठी रिक्षाने बाबा पेट्रोल पंप चौकात आले. तेथे उतरून ते पंचवटी हॉटेलजवळील बसथांब्याजवळ गेले. तेथे ते सर्वजण भाडे तत्त्वावर बुक केलेल्या जीपची वाट बघत उभे होते. तेवढ्यात तेथे ७ ते ८ जणांचे टोळके आले. त्यांनी गोरख व त्याच्या सहकाऱ्यांकडे आइस्क्रीम खाण्यासाठी पैसे मागून त्यांची टिंगल उडविणे सुरू केले. गोरखने आमच्याकडे पैसे नाहीत, आम्ही देवदर्शनासाठी निघालो आहोत, असे सांगितले. तेव्हा त्यांनी या सर्वांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करीत त्यांच्या खिशातील ८ हजार रुपये बळजबरीने हिसकावून नेले. घाबरलेल्या अवस्थेत ते सर्वजण क्रांतीचौक ठाण्यात गेले. तेथे त्यांनी घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानुसार पोलिसांनी रीतसर तक्रार लिहून घेतली व अज्ञात ८ जणांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक निरीक्षक अशोक गिरी हे करीत आहेत. बाबा पेट्रोल पंप चौकात क्रांतीचौक ठाण्याची पोलीस चौकी आहे. या चौकीत दिवस-रात्र पोलिसांचा राबता असतो. तुळजापूरला निघालेल्या या भाविकांना लुटण्याचा थरार हा पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर घडला. चौकीतील पोलीस सतर्क असते, तर कदाचित हा प्रकार टळला असता अथवा दरोडेखोरांना वेळीच जेरबंद करता आले असते, अशी खंत या भाविकांनी व्यक्त केली.