शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

कटकट गेट येथील रस्त्याचे काम थांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:06 IST

औरंगाबाद : शहरातील रस्ते गुळगुळीत करण्यासाठी राज्य शासनाने १५२ कोटींचा निधी दिला. पोलीस मेस ते कटकट गेट रस्त्याचे काम ...

औरंगाबाद : शहरातील रस्ते गुळगुळीत करण्यासाठी राज्य शासनाने १५२ कोटींचा निधी दिला. पोलीस मेस ते कटकट गेट रस्त्याचे काम याच योजनेतून सुरू करण्यात आले. ६ कोटी ५० लाख रुपये खर्च करून करण्यात येणाऱ्या कामात मागील आठ दिवसांपासून अडथळा निर्माण करण्यात आला आहे. ८१० मीटर काम झाल्यानंतर थांबविण्यात आल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

कटकट गेट ते पोलीस मेसपर्यंत शहर विकास आराखड्यानुसार १०० फूट रुंद रस्ता आहे. रस्ते विकास महामंडळामार्फत काम सुरू करण्यात आले. आणि पोलीस मेस ते कटकट गेटपर्यंत डाव्या बाजूला ८१० मीटर काम करण्यात आले. कटकट गेटपासून हाकेच्या अंतरावर काही मंडळींनी जमिनीचा वाद उकरून काढत काम थांबविले. महापालिकेच्या नगररचना विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पहिल्या दिवशी रस्त्यांची मोजणी केली. १०० रस्त्यावर नियोजित ठिकाणीच काम सुरू असल्याचा निर्वाळा दिला. त्यानंतरही काही नागरिकांनी काम सुरू होऊ दिले नाही. विशेष बाब म्हणजे ज्या ठिकाणी जागेच्या मालकीचा वाद उपस्थित झाला आहे तेथे महापालिकेने काही वर्षांपूर्वीच भूसंपादनासाठी टीडीआरही दिलेला आहे. त्यामुळे या भागात भूसंपादनाचा कोणताही विषय शिल्लक नसल्याचे महापालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले. रस्त्याचे काम मागील आठ ते दहा दिवसांपासून बंद असल्यामुळे वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

जाफर गेट रस्त्यावरही प्रचंड अतिक्रमणे

१५२ कोटी रुपयांच्या शासन निधीतून लक्ष्मण चावडी ते जाफर गेटपर्यंतच्या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. या रस्त्यात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे आहेत. त्यामुळे कामास विलंब होत आहे.

किलेअर्क येथील अतिक्रमणे जशास तशी

किलेअर्क येथील अतिक्रमणे हटविण्यासाठी महापालिकेने मागील महिन्यात मालमत्ताधारकांना नोटीस बजावल्या. मात्र, महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने कोणतीही कारवाई केली नाही. सिटी चाैक ते किलेअर्क पुलापर्यंत काम पूर्ण झाले आहे.