शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याला घोटाळ्याचा सुरु ंग

By admin | Updated: August 17, 2016 00:52 IST

औरंगाबाद : सार्वजनिक बांधकाम विभाग म्हटले की घोटाळे आणि निकृष्ट कामांची मालिका संपता संपणार नाही. या विभागाची प्रतिमा चांगली असावी,

औरंगाबाद : सार्वजनिक बांधकाम विभाग म्हटले की घोटाळे आणि निकृष्ट कामांची मालिका संपता संपणार नाही. या विभागाची प्रतिमा चांगली असावी, यासाठी बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील हे देखील प्रयत्न करीत आहेत; परंतु प्रतिमा गुणवत्तापूर्ण होता होत नाहीये. विभागाचे अब्रूचे धिंडवडे काढणारे एक प्रकरण चर्चेत आले आहे. आडगाव-लिंगदरी या गावासाठी असलेल्या रस्त्याला घोटाळ्याचा सुरुंग लागला आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या मतदारसंघातील आडगाव-लिंगदरी या गावातील रस्ता दीड वर्षांपूर्वीच पूर्ण करून तो जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करण्यात आला आहे; परंतु तो रस्ता अर्धवट असल्याने व चौकशी होण्याच्या भीतीने बांधकाम विभाग, वनविभागाची परवानगी न घेता त्या रस्त्याच्या तत्कालीन अधिकारी, कंत्राटदाराने तेथे विनापरवाना घाट फोडण्यासाठी सुरूंग लावण्याचे काम हाती घेतले. नागरिकांच्या जिवाशी खेळ करण्याचा हा प्रयत्न विधानसभा अध्यक्षांच्या मतदारसंघातच घडला. ६५ लाखांमध्ये त्या रस्त्याचे काम देण्यात आले होते. त्या कामाचे पूर्ण बिल वाटप करण्यात आले. विधानसभा निवडणुका लागल्यामुळे थातुरमातुर पद्धतीने ते काम करून कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांनी त्यामध्ये हात धुऊन घेतले. परंतु रस्त्याचे काम अर्धवट राहिले. रस्त्याच्या कामाबाबत गावकऱ्यांनी तक्रारी सुरू केल्यानंतर या कामाचे बिंग फुटले. गेल्या आठवड्यात सुरूंग लावून त्या रस्त्याच्या आड येणारी टेकडी फ ोडण्याचा प्रयत्न झाला. तसेच काही जेसीबीने त्या रस्त्याचे काम विनापरवाना करणे सुरू होते. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे म्हणाले, त्या रस्त्याच्या कामाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. टेंडरमध्ये जेवढी रुंदी होती, तेवढ्या रुंदीचे काम झाले नाही. घाट फोडून रस्ता करायचा होता. ६५ लाख रुपयांचे पूर्ण बिल विभागाने अदा केल्याची माहिती समोर आली आहे. रस्ता पूर्ण करून घेण्यात येईल. विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत हा प्रकार घडला आहे. कामाच्या वेळी असलेले काही वरिष्ठ ते कनिष्ठ अभियंते बदलून गेले आहेत. विनापरवाना सुरूंग लावण्यात आल्यामुळे हा सगळा प्रकार समोर आला.