शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

घाटनांद्रा घाटातील रस्त्यावर पडले भगदाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:04 IST

घाटनांद्रा : घाटनांद्रा ते पाचोरादरम्यान असलेल्या घाटनांद्रा घाटातील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. हा रस्ता जागोजागी खचल्याने मोठमोठे भगदाड पडल्याने ...

घाटनांद्रा : घाटनांद्रा ते पाचोरादरम्यान असलेल्या घाटनांद्रा घाटातील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. हा रस्ता जागोजागी खचल्याने मोठमोठे भगदाड पडल्याने हा घाट मृत्यूचा सापळा बनला आहे. यासंदर्भात नागरिकांनी वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दुरुस्ती करण्याची मागणी केली. तरी देखील विभागाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे मोठा अपघात घडल्यास याला जबाबदार कोणाला ठरवायचे, असा प्रश्न प्रवाशांकडून केला जात आहे.

मराठवाड्यातून खान्देश भागाला जोडणारा रस्ता म्हणून राज्य महामार्ग क्रमांक ४८ ची ओळख आहे. या मार्गावर नेहमी मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते, तर रात्रीच्या वे‌ळी अवजड वाहने मोठ्या प्रमाणात धावतात. दरम्यान, घाटनांद्रा घाटात जागोजागी रस्त्याच्या कडेला भगदाड पडले आहेत. घाटनांद्रा ग्रामपंचायतीने जानेवारी २०२१ मध्ये जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता यांना निवेदनाद्वारे ही बाब लक्षात आणून दिली. परंतु, प्रशासनाने या निवेदनाला केराची टोपली दाखविली आहे.

-----

संरक्षण कठडे नसल्याने भगदाड

घाटनांद्रा घाटातील सर्व वळणाच्या रस्त्यांना संरक्षण कठडे बसविण्यात आलेले नाहीत. ज्या ठिकाणी कठडे आहेत, अशा ठिकाणी भगदाड पडल्याने वाहनाचा अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. एकूण नऊ किलोमीटर घाटाच्या रस्त्याकडे बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे. या मार्गावरून नियमित प्रवास करणारे रावसाहेब शिंदे, लक्ष्मीकांत साळवे, सुभाष पाटील, जितेंद्र गायकवाड, रितेश महाले, संतोष पाटील यांनी रस्ता दुरुस्तीची मागणी केली.

---

170721\img-20210714-wa0043.jpg

घाटनांद्रा घाटातील रस्त्यावर पडलेले भगदाड