शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये बांधकामात रस्ते ‘ढापले’ !

By admin | Updated: November 16, 2014 00:37 IST

सोमनाथ खताळ , बीड शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि अंतर्गत रस्त्यांचे होत असलेले अरूंदीकरण याला दुसरे तिसरे कोणी नाही तर पालिकाच जबाबदार आहे.

सोमनाथ खताळ , बीडशहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि अंतर्गत रस्त्यांचे होत असलेले अरूंदीकरण याला दुसरे तिसरे कोणी नाही तर पालिकाच जबाबदार आहे. संबंधीत विभागातील कर्मचाऱ्यांचे हात ओले करून बोगस बांधकाम परवाने मिळत रस्ते ढापण्याचा महाप्रताप बीडमध्ये सुरू आहे.एकही रस्ता असा नाही की ज्याची रूंदी नियमाप्रमाणे आहे. प्रत्येक रस्ता हा अरूंद झाला आहे. रस्त्यांच्या जागेत बीडमधील अनेक महाभागांनी , दुकाने इमारती उभारल्या आहेत. पेठबीड भागात तर पालिकेतील अधिकाऱ्यांनी ‘हद्द’च पार केली आहे. बांधकामासाठी परवानगी दिली खरी मात्र, ते घर त्याच जागेत, तेवढ्याच हद्दीत बांधले जाते का? याची शहानिशा सुद्धा केली जात नाही. एकच नाही तर प्रत्येक मुख्य, गल्लीबोळातील रस्त्यांवर घरे बांधण्यात आलेली आहेत. यावर कारवाया करण्यास मात्र पालिकेतील अधिकारी, कर्मचारी ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष करीत आहेत. या अधिकाऱ्यांचे अभय असल्यामुळेच दिवसेंदिवस रस्ते अरूंद बनत चालले असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते ललीत अब्बड यांनी केला आहे. सुभाष रोडही अरूंद झाला आहे. या मुख्य रस्त्यावर अनाधिकृतपणे इमारती, दुकाने थाटले असून सध्या ते जोमात चालू आहेत.पालिकेचे अभय असलेले उदाहरणपेठ बीड भागातील हिरालाल चौकात संदीप रामदास दहिवाळ, रामदास श्रीराम दहिवाळ यांनी पालिकेकडून ९ जानेवारी २०१२ ला बांधकामासाठी परवानगी घेतली होती. २.३८ बाय २.८४ चौमी जागेत बांधकामासाठी मंजूरी देण्यात आली होती. त्याप्रमाणे नकाशाही पालिकेने तयार केला आहे. मात्र दहिवाळ हे जास्त जागेत बांधकाम करीत असल्याची तक्रार ललीत अब्बड यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे दिली होती. त्यानंतर ९ आॅक्टोबर रोजी प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ५४ नुसार त्यांना नोटीसही पाठविण्यात आलेली आहे. या नोटीसमध्ये अनाधिकृतपणे बांधकाम चालू असल्याचे नमूद केले असून तात्काळ हे बांधकाम थांबवावे असे सांगण्यात आले आहे. मात्र, या नोटीसला केराची टोपली दाखवित हे बांधकाम अद्यापही सुरूच आहे.