शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

वीस वर्षांपासून अडलेला रस्ता मार्गी

By admin | Updated: August 12, 2014 02:02 IST

औरंगाबाद : सुमारे वीस वर्षांपासून मागणी होत असलेला दौलताबाद रस्त्यावरील शरणापूर फाटा ते वाळूज परिसरातील शहाजापूर या भागाला जोडणारा पाच किलोमीटरचा रस्ता मार्गी लागला

औरंगाबाद : सुमारे वीस वर्षांपासून मागणी होत असलेला दौलताबाद रस्त्यावरील शरणापूर फाटा ते वाळूज परिसरातील शहाजापूर या भागाला जोडणारा पाच किलोमीटरचा रस्ता मार्गी लागला असून, हा रस्ता वर्षभरात पूर्ण होणार आहे.औरंगाबाद शहरात येणाऱ्या वाहनांची वर्दळ कमी व्हावी व शहराच्या वाहतुकीवरील ताण कमी व्हावा, या हेतूने शहराच्या बाहेरून वाहतूक व्हावी असे प्रयत्न आहेत. शरणापूर फाटा ते औरंगाबाद - मुंबई एक्स्प्रेस रोडला शहाजापूर येथे जोडणाऱ्या रस्त्याची मागील वीस वर्षांपासून वाहतूकदार संघटनेची मागणी होती. हा रस्ता एकेरी असून याठिकाणाहून वेगाने वाहतूक होऊ शकत नाही. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून तो पूर्ण न झाल्याने कन्नड, धुळे या भागातून अहमदनगर किंवा वाळूज औद्योगिक वसाहतीत जाणारी वाहतूक ही नगरनाका येथून जाते. त्यामुळे पडेगाव रस्त्यावर व नगरनाका ते वाळूज या रस्त्यावर वाहनांची गर्दी होते. याचा परिणाम म्हणून छोटे मोठे अपघातही घडतात. शरणापूर फाट्यापासून करोडीमार्गे शहाजापूर या गावाचे अंतर केवळ पाच किलोमीटर इतकेच आहे. हा रस्ता शहाजापूरजवळ औरंगाबाद- मुंबई एक्स्प्रेस रोडला मिळतो. कन्नडवरून येणारे ट्रक तसेच वेरूळ, दौलताबाद, खुलताबाद या ठिकाणाहून येणाऱ्या पर्यटकांसाठी शिर्डी, कोपरगाव आदी भागांकडे जाण्यासाठीदेखील हा रस्ता उपयुक्त आहे. मात्र, हा एकेरी रस्ता असल्याने वाहने औरंगाबाद शहराच्या दिशेने येतात. केवळ पाच किलोमीटरचा रस्ता पूर्ण झाल्यास वाहनधारकांची मोठी सोय होणार असल्याचे औरंगाबाद मालवाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष फय्याज खान यांनी सांगितले. औरंगाबाद महापालिकेत जकात लागू असताना कन्नड, खुलताबादकडून येणारी अनेक वाहने जकात चुकविण्याच्या हेतूने किंवा वाहतूक कर चुकविण्याच्या हेतूने शरणापूरपासून करोडीमार्गे जात असत. सद्य:स्थितीला पावसाळ्यामुळे या रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. त्यामुळे वाहने जाऊही शकत नाहीत, अशी अवस्था आहे.