संजय तिपाले , बीडजन्माला आलेल्या प्रत्येकाला मृत्यू चुकलेला नाही; परंतु जन्मानंतर अवघ्या एक वर्षाच्या आत मृत्यूमुखी पडणाऱ्या अर्भकांची संख्या दिवसेंदिवस अतिशय झपाट्याने वाढू लागली आहे. अर्भक मृत्यूत बीड जिल्हा राज्यातील पहिल्या पाचमध्ये आहे. स्त्री- भू्रणहत्येपाठोपाठ आता अर्भकमृत्यूचे संकट ‘आ’ वासून उभे आहे. ‘रेडझोन’मधून जिल्हा बाहेर काढण्याचे आव्हान आरोग्य विभागापुढे कायम आहे.नवा पाहुणा घरात आल्यावर जन्मादात्यांच्या आनंदाला पारावर उरत नाही. महिलांसाठी मातृत्वाचे क्षण तर अविस्मरणीय अन् सुखद! मात्र, काहींच्या बाबतीत हा आनंद क्षणभंगूर ठरला आहे. एक वर्षाच्या आत मृत्यूमुखी पडणाऱ्या बालकांंची नोंद सरकारदरबारी अर्भकमृत्यू म्हणून होते.भू्रण हत्या, बालमृत्यू, मातामृत्यू यामुळे जिल्ह्यावर केंद्र सरकारने ‘फोकस’ केलेले आहे. मुलींच्या जन्मदरात ८०१ वरुन ८५३ अशी सुधारणा करण्यात प्रशासनाला यश आले आहे. तथापि, अर्भकमृत्यूला अटकाव घालणे प्रशासनाला शक्य झाले नसल्याची बाब पुढे आली आहे. २०१० ते २०१४ या चार वर्षांत सुमारे २ हजार ९९० इतकी बालके एक वर्षाच्या आतच मृत्यूमुखी पडली. त्यामुळे आरोग्य विभागासाठी हा चिंतेचा विषय ठरत आहे. २०१३-१४ मध्ये जिल्ह्याचा अर्भकमृत्यूदर २५ टक्के इतका आहे. पाटोदा तालुक्याचा दर सर्वाधिक ६७.४ टक्के इतका असून माजलगावचा दर सर्वात कमी म्हणजे ११.५८ टक्के इतका आहे.जिल्ह्यातील अर्भकमृत्यूचे प्रमाण आरोग्य विभागाने जीवंत बालकांच्या संख्येवरुन निश्चित केली आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील ५० गावांना समोर ठेवून आरोग्य विभागानेच २०१३- १४ मध्ये अर्भक मृत्यूमागची कारणमिंमासा शोधण्यासाठी सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणात अर्भकमृत्यूदर ३५ टक्के इतका असल्याचा निष्कर्ष पुढे आला होता. राज्याचा अर्भकमृत्यूदर २५ टक्के आहे. बीडमधील अर्भकमृत्यूदराचे दोन स्वतंत्र आकडे चिंताजनकच आहेत.अल्पवयीन मुलींच्या विवाहाचा टक्का ३४.६५ इतका आहे.४नवजात बालकांमधील जंतूसंसर्र्ग४जन्मजात व्यंग४कमी वयाचे बाळ जन्माला येणे४जिल्ह्यातील वाढत्या अर्भकमृत्यूमागे येथील भौगोलिक स्थिती, महिलांना गरोदरपणात करावी लागणारी कष्टाची कामे या कारणांचाही समावेश असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे यांनी सांगितले.गरोदरपणात महिलांनी कष्टाची कामे टाळावीत़४सकस आहार व आराम घ्यावा़४वेळोवेळी डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी करावी़४प्रसूतीवेळी तज्ज्ञ डॉक्टर, प्रशिक्षित कर्मचाऱ्यांकडून उपचार घ्यावेत.४नवजात बालकांच्या उपचाराबाबत तत्परता४जन्मानंतर बालकांना तात्काळ अंगावरील दूध पाजावे.४डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बालकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी़
कोवळ्या जीवांवर उठलीयं नियती!
By admin | Updated: January 13, 2015 00:15 IST