शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

पाणी देण्याचा निर्णय योग्य

By admin | Updated: November 14, 2015 00:54 IST

औरंगाबाद : गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने जायकवाडीसाठी ऊर्ध्व भागातील धरणातून १२.८४ टीएमसी पाणी सोडण्याचा घेतलेला निर्णय

औरंगाबाद : गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने जायकवाडीसाठी ऊर्ध्व भागातील धरणातून १२.८४ टीएमसी पाणी सोडण्याचा घेतलेला निर्णय महाराष्ट्र जल प्राधिकरणाच्या आदेशाशी सुसंगत असून, त्यात हस्तक्षेप करण्याची गरज नाही, असा निर्वाळा प्राधिकरणाचे अध्यक्ष रविभूषण बुद्धिराजा, सदस्या चित्कला झुत्शी व सदस्य एस.व्ही. सोडल यांनी दिला आहे. नाशिक व नगर जिल्ह्यांतील साखर कारखाने व इतर, अशा एकूण सात याचिकाकर्त्यांनी महामंडळाच्या १७ आॅक्टोबर २०१५ च्या आदेशाला आव्हान दिले होते.जायकवाडी जलाशयात पिण्याचे पाणी उपलब्ध असल्यामुळे वरच्या धरणातून पाणी सोडण्याची आवश्यकता नाही. पाणी सोडल्यास उलट ऊर्ध्व भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होईल आणि ऊस व बागायती पिकांचेही मोठे नुकसान होईल. त्यामुळे हा निर्णय रद्द करावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. त्यावर झालेल्या सुनावणीनंतर प्राधिकरणाने महामंडळाच्या पाणी सोडण्याच्या आदेशाला अव्हान दिले होते. मराठवाड्यातील नागरिकांतर्फे परभणीचे प्रा. अभिजित धानोरकर जोशी यांनी अ‍ॅड. यशोदीप देशमुख यांच्या मार्फत लेखी निवेदन देऊन प्राधिकरणाच्या आदेशाचे समर्थन केले. मराठवाड्यासाठी जायकवाडी जलाशयात किमान २२ टीएमसी पाणी ऊर्ध्व भागातून उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हे अतिरिक्त पाणी सोडण्याबाबत निर्णय घ्यावा, असे प्रतिपादन अ‍ॅड. देशमुख यांनी केले. त्याचप्रमाणे जायकवाडी क्षेत्रातील पाण्याच्या गरजेची संपूर्ण आकडेवारी व नाशिक व नगर जिल्ह्यांतील लपवून ठेवलेल्या पाण्याची आकडेवारी समोर येईपर्यंत सुनावणी स्थगित ठेवण्याची विनंतही त्यांनी केली. औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांनी १३.५२ टीएमसी पाण्याची गरज असल्याची माहिती सादर केली. पाण्याचा ३० टक्के वहनव्यय गृहीत धरून केवळ ८.९७ टीएमसी पाणी लक्षात घेता पिण्याच्या पाण्यासाठी १२१.८४ टीएमसी पाणी सोडण्याचा जो निर्णय घेण्यात आला तो योग्यच आहे, असा निर्वाळा प्राधिकरणाने ९ नोव्हेंबर २०१५ रोजी दिला व त्याची अंमलबजावणी तात्काळ करावी, असेही स्पष्ट केले. या निर्णयाने नगर, नाशिककरांना पुन्हा चपराक बसली आहे.